Imtiaz Jalil News : आधी नाकारली, मग परवानगी दिली ; ठेवीदारांचा मोर्चा धडकला..

Aimim : लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार आहे.
Imtiaz Jalil News
Imtiaz Jalil NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील दोनशे कोटींचा घोटाळा गाजतो आहे. (Imtiaz Jalil News) हजारो ठेवीदांराचे कोट्यावधी रुपये घेवून संस्थेचे संचालक मंडळ फरार होते. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ठेवीदारांच्या बाजूने आंदोलन उभारण्याचा इशारा दिल्यानंतर आदर्शचा अध्यक्ष अंबादास मानकापे व इतर तीन संचलाकांना पोलिसांनी अटक केली.

Imtiaz Jalil News
Maharashtra Monsoon Session : बंडानंतर अधिवेशनात दोन्ही पवार गट आमने-सामने; आता भुजबळ, मुंडे गाणार सरकारचे गुणगान

मात्र संचालकांना अटक करून भागणार नाही, तर ठेवीदारांचे पैसे कधी परत मिळणार? याचे आश्वासन पोलिसांकडून घेण्यासाठी आज आयुक्तालयावर मोर्चा निघाला. (Imtiaz Jalil) तत्पुर्वी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो हे कारण देत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. (Aimim) मात्र रात्री उशीरा मोर्चाला पुन्हा परवागनी देण्यात आली. त्यामुळे नियोजित वेळेनूसार क्रांतीचौकातून ठेवीदारांचा भव्य मोर्चा पोलिस आयुक्तालयावर धडकला.

खासदार इम्तियाज जलील देखील या मोर्चात सहभागी झाले होते. विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे, सभागृहात आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्यावर उपमुख्यमंत्री आम्ही अध्यक्ष, संचालकांना अटक केली, असे सांगून हात झटकतील. (Scam) पण ठेवीदारांचे पैसे परत कधी देणार? याची निश्चित तारीख जाहीर केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशार इम्तियाज जलील यांनी यावेळी दिला.

आधी पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती, लोकशाहीत प्रत्येक व्यक्तीला अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार आहे. येथे आदर्श नागरी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व संचालकांनी केलेल्या फसवणुकीमुळे शेकडो ठेवीदारांचे कष्टाचे पैसे बुडाले आहेत आणि पोलीस सांगतात की ते मोर्चा काढू शकत नाहीत. कारण त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल. हे काय मूर्खपणाचे कारण आहे?

पोलिसांनी कधी कोणत्या राजकीय पक्षाचा मोर्चा याच कारणासाठी रोखला का ? मग आता का ? फक्त ते असहाय लोक आहेत जे त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी लढत आहेत म्हणून का? पोलिसांवर दबाव आहे का ? असा सवाल करत मोर्चा ठरल्याप्रमाणे निघणारच, असा इशारा मी दिला. त्यानंतर परवानगी मिळाली आणि आम्ही पोलिस आयुक्तालयावर धडकलो, असे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com