Imtiaz Jalil News : शांततेच आवाहन करणाऱ्या उद्योजकांची कोंडी, इम्तियाज म्हणाले भूमिका घ्या..

Aimim : कशाच्या आधारावर शहरातील वातवरण बिघडेल, शांतता भंग होईल असा दावा उद्योजक करत असल्याचा सवाल उपस्थितीत केला
Imtiaz Jalil Sambhajinagar News
Imtiaz Jalil Sambhajinagar NewsSarkarnama

Chhatrapati Sambahajinagar : नामांतराच्या मुद्यावरून शहरातील वातावरण तापले आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वाखाली नामांतरविरोधी कृती समितीचे साखळी उपोषण सुरू आहे. विनापरवानगी कॅन्डल मोर्चा काढला म्हणून इम्तियाज यांच्यासह शेकडो जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून यावर मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे.

Imtiaz Jalil Sambhajinagar News
Imtiaz Jalil News : पंच्याऐंशी टक्के खासदार हे जात आणि पैशाच्या जोरावर निवडून येतात..

तसेच इम्तियाज जलील यांना उद्देशून ते संसदेत शहराचे, उद्योजकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडतात, त्यामुळे शहराचे, उद्योजकांचे नुकसान होईल, देशपातळीवर शहराचे नाव बदनाम होईल असे काही करणार नाही, असा आम्हाला विश्वास असल्याचे म्हटले. (Aimim) परंतु इम्तियाज यांनी घेतलेल्या पावित्र्यांमुळे आता उद्योजकांचीच कोंडी झाल्याचे दिसून आले आहे.(Aurangabad)

इम्तियाज जलील यांनी उद्योजकांना सुनावतांना कशाच्या आधारावर शहरातील वातवरण बिघडेल, शांतता भंग होईल असा दावा उद्योजक करत असल्याचा सवाल उपस्थितीत केला आहे. शिवाय उद्योजक म्हणून नामांतरावर तुमची भूमिका काय? हे आधी स्पष्ट करा, असे आवाहन केले आहे. जी-२० परिषदेमुळे जागतिक पातळीवर शहराची प्रतिमा चांगली झाली आहे. कोरोनानंतर आता कुठे औद्योगिक गाडा सुरळीत होत आहे.

अशावेळी नामांतराच्या विषयावरून शहराच्या व औद्योगिक विकासाला गालबोट लागेल, शांतता भंग पावेल असे कुठलेही काम होवू नये. सरकारने त्यांच्या अधिकारात शहराच्या नामांतराचा निर्णय घेतला आहे. त्याला विरोध असणाऱ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा, न्यायालयात दाद मागण्याचा देखील अधिकार आहे. परंतु हे करत असतांना शहराचे नाव बदनाम होवू नये, शांततेला गालबोट लागू नये, यासाठी सरकारने मार्ग काढावा, असे पत्र उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार व इतरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.

यावर इम्तियाज जलील यांनी उद्योजकांनाच फैलावर घेतले. तुमचे नामांतराला समर्थन असेल तर तसे जाहीर करा, नसेल तर तेही सांगा. बिनबुडाच्या तांब्यासारखं वागू नका. तुम्ही आधी भूमिका घ्या, उद्योजक म्हणून तुमचे मत काय आहे? ते ही नागरिकांना कळू द्या. शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्थेची काळजी आम्हाला देखील आहे, ती बिघडत आहे, हे तुम्ही कशावरून ठरवता? असा सवाल देखील इम्तियाज यांनी उद्योजकांना केला आहे. त्यामुळे उद्योजकांनी घेतलेली भूमिका आता त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com