
Aimim : दोन दिवसांपुर्वी शहराच्या एका भागात दंगल झाली, यात एकाचा मृत्यू झाला. शहरा तणावाची परिस्थीती आहे. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी दिलेली असतांना पोलिसांनी आजच सावरकर गौरव यात्रा काढायला परवानगी कशी दिली? पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत? असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थितीत केला.
आजच्या ऐवजी उद्या सावरकर गौरव यात्रा काढली असती तर काय बिघडले असते? असा सवाल देखील इम्तियाज यांनी केला. महाविकास आघाडीची `वज्रमुठ` सभा छत्रपती संभाजीगरात होत आहे. (Aimim) या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी शिंदे-भाजप सरकारवर गंभीर आरोप केले.
केवळ राजकीय कुरघोडीतूनच महाविकास आघाडीच्या सभेच्या दिवशीच सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. सर्वसमान्य नागरिकांशी, त्यांच्या जिवीताची कुठलीही काळजी सत्ताधाऱ्यांना राहिलेली नाही. ज्या मंत्र्यांवर शहरात शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी आहेत, तेच वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत.
या सगळ्या प्रकरणात पोलिसांची भूमिका देखील संशयास्पद असून ते दबावाखाली काम करत आहेत, असा आरोप देखील इम्तियाज यांनी केला. एखादी गॅंग जशी आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या विरोधात रस्त्यावर उतरते त्याच पद्धतीने शिंदेंची शिवसेना व भाजप महाविकास आघाडीच्या विरोधात उतरली आहे. सारवकरांची आज ना पुण्यतिथी, ना जयंती मग यात्रेसाठी अट्टाहास का? राजकारण करा, पण लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असेही इम्तियाज यांनी सुनावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.