Imtiaz Jalil On Mahagathbandhan : आम्हाला का बोलावलं नाही, आमच्याशिवाय भाजपला हरवणे शक्य नाही...

Aimim : आम्हाला बोलवा, आम्ही वाट पाहतोय. प्यासा कुअे के पास जाता है, या कुआँ प्यासे के पास ?
Mp Imtiaz Jalil News,Chhatrapati Sambhajinagar
Mp Imtiaz Jalil News,Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : देशात भाजपला हरवायचं असेल तर आम्हाला सोबत घेतल्याशिवाय ते शक्य नाही. देशाच्या अनेक राज्यांमध्ये असदोद्दीन ओवेसी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. (Imtiaz Jalil On Mahagathbandhan) मग विरोधकांच्या बैठकीला आम्हाला का बोलावलं नाही, असा सवाल एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थितीत केला. आम्हाला सोबत घेतल्याशिवाय भाजपला पराभूत करण्याचे स्वप्न पुर्ण होवू शकत नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.

Mp Imtiaz Jalil News,Chhatrapati Sambhajinagar
Shivsena On Abdul Sattar News : सिल्लोडमध्ये मशाल पेटणार ? सत्तारांना घेरण्यासाठी ठाकरेंची सेना मैदानात...

एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदोद्दीन ओवेसी (Asaduddin Owasi)आज छत्रपती संभाजीनगरात होते. मलकापूर येथील एका कार्यक्रमाला जाण्यापुर्वी ते माध्यमांशी बोलले. पाटणा येथे देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक काल पार पडली. भाजप विरोधातील आघाडीत एमआयएमचा (Aimim) समावेश नसेल तर भाजपला पराभूत करता येणार नाही, आम्हाला बोलवा, आम्ही वाट पाहतोय, असे इम्तियाज जलील यांनी आवाहन केले. त्याला ओवेसी यांनी दुजोरा दिला.

इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी मांडलेली भूमिका हीच माझी देखील भूमिका आहे. भाजपला हरवायचं असेल तर त्यासाठी एक अजेंडा तयार करावा लागले, कोणत्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत, हे स्पष्ट करावे लागेल. देशात आदिवासी, मुस्लिम आणि वंचित समुह सर्वाधिक पिडित समाज आहे. खोट्या केसेस दाखल करून अडकवणे, माॅबलिंचिंग सारख्या घटनांमध्ये सर्वाधिक नुकसान या लोकांचे झाले आहे.

मग याचा तुम्ही विचार करणार नाही का? आमची ताकद काय आहे हे आम्ही गेल्या लोकसभा निवडणुकीत दाखवून दिली आहे. त्यामुळे भाजपला हरवायचे असेल तर सगळ्यांना सोबत घेणे गरजेचे आहे. विरोधकांच्या बैठकीत आम्हाला का बोलावले नाही, हे माध्यमांनी त्यांना विचारले पाहिजे. प्यासा कुअे के पास जाता है, या कुआँ प्यासे के पास ? असा उलट सवाल देखील ओवेसी यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com