दुध संघात `नाना`च, शिवसेनेशी हातमिळवणी करत काॅंग्रेसचा विरोध मोडून काढला..

काॅंग्रेसचे कल्याण काळे वगळता बागडेंना फारसा कुणाचा विरोध नव्हता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बागडेंनी प्रयत्न सुरू केले होते. (Mla Haribhau Bagde)
Sattar-Bagde-Kale
Sattar-Bagde-KaleSarkarnama

औरंगाबाद : जिल्हा दुध संघाची निवडणुक यंदा चांगलीच गाजली. काही महिन्यांपुर्वी झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत एकत्रित पॅनल असूनही भाजपचे (Bjp) आमदार व जिल्हा बॅंकेतील ज्येष्ठ संचालक असलेल्या हरिभाऊ बागडेंचा (Haribhau Bagde) गेम झाला.

शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी काॅंग्रेसमधील आपले जुने मित्र व जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांना हाताशी धरून बॅंक ताब्यात घेतली. नितीन पाटील यांना शिवसेनेत आणून त्यांना अध्यक्षही केले. नानांना अशा पद्धतीने बॅंकेतून घालवल्यानंतर सहाजिकच जिल्हा दूध संघात काय होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

काॅंग्रेसचे कल्याण काळे वगळता बागडेंना फारसा कुणाचा विरोध नव्हता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बागडेंनी प्रयत्न सुरू केले. पण काळेंनी यात खोडा घातला, त्यामुळे १४ पैकी ७ संचालक बिनविरोध झाले तर सात संचालकांसाठी निवडणूक लागली.

दुध संघात नाना पाहिजेच, अशी भूमिका घेत भाजपने अत्यंत सावध पावले उलचलली. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा बॅंकेची पुनरावृत्ती होणार नाही, याची खात्री दिल्यानंतरही बागडे यांनी स्वतंत्रपणे राजकीय डावपेच टाकले.

सत्तार यांना न दुखवता काळेंचा विरोध मोडून काढण्याची कसरत बागडेंनी पार पाडली. त्यामुळे बागडेंविरोधात पॅनल उभे करण्यासाठी रसद पुरवणारेच एकता सहकार पॅनलला येवून मिळाल्याने विरोधी पॅनलची हवा निघून गेली.

Sattar-Bagde-Kale
मी तालुक्यात शेरच; पक्षप्रमुखांनी आदेश दिला तर लोकसभेला विरोधात लढणारच..

त्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून या निवडणुकीकडे पाहिले गेले. शिवसेना-भाजप आणि काॅंग्रेस असे तिघे आता जिल्हा दूध संघाच्या सत्तेत असणार आहे. राहिला प्रश्न अध्यक्षपदाचा तर त्यावर बागडे नानाच राहतील यावर देखील विजयी बैठकीत शिक्कामोर्तब झाले.

उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या संचालकाची वर्णी लागू शकते. अर्थात त्यासाठी सत्तार हे आग्रही राहणारच. एकंदरित सुरूवातीला एकतर्फी वाटणारी जिल्हा दुध संघाची निवडणूक अर्धे संचालक मंडळ निवडून आल्यानंतर अधिक रंगतदार झाली. बागडेंचा सत्तार-काळे जोडी पुन्हा गेम करणार अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या.

पण बागडे आणि भाजपच्या इतर नेत्यांनी यावेळी अत्यंत नियोजित पद्धतीने ही निवडणूक हाताळली. परिणामी बिनविरोध संचालकांची निवड करून बागडेंना जे साध्य करायचे होते, ते त्यांनी निवडणूक झाल्यानंतरही साध्य केले असेच म्हणावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com