नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचीच `पंचाईत`, फडणवीसांचा टोला

शिवसेनेकडे हिंदुत्व शिल्लक राहिलेच नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील हिंदुत्व शिवसेनेने कधीच सोडले आहे. त्यांचे नेते हिंदुत्व फक्त आता बोलतात. (Devendra Fadanvis)
Devendra Fadanvis-Uddhav Thackeray
Devendra Fadanvis-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : गेल्या दोन वर्षात झालेल्या ग्रामपंचायत ते नगरपंचायत व इतर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना खाली खाली गेली आहे. (Shivsena) ज्या पक्षाचा राज्यात मुख्यमंत्री आहे, तो पक्ष चौथ्या क्रमांकावर गेला याचा विचार त्यांनी केला पाहिजे. (Uddhav Thackeray) त्यामुळे काल हाती आलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर खरी पंचाईत शिवसेनेचीच झाली असल्याचा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लगावला.

नगरपंचायत निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला, त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी लोकांचा विश्वास अजूनही भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला. नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावर एका वृत्तवाहिनीशी बोलतांना फडणवीस यांनी शिवसेनेची खालावत चाललेली कामगिरी, हिंदुत्व आदी विषयावर आपले मत व्यक्त केले.

फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काॅंग्रेसच्या जोरावर राष्ट्रवादी राज्यात आपली ताकद वाढवत आहे. विशेषतः शिवसेनेच्या मतदारसंघात जिथे राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला तिथे त्याला ताकद देण्याचे काम त्यांचे नेते करतायेत. त्यामुळे शिवसेनेच्या विद्यमान आमदाराला निधी मिळत नाही, त्याचे काम होत नाही, पण पराभूत झालेल्या, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे काम होते ही वस्तुस्थिती आहे.

शिवसेनेची कामगिरी गेल्या दोन वर्षात प्रचंड खाली गेली आहे. हिंदुत्व आणि हिंदुत्वाची वोटबॅंक ही काही एकट्या शिवसेनेची मक्तेदारी नव्हती. ती आमच्याकडे देखील होती, पण आता शिवसेनेकडे हिंदुत्व शिल्लक राहिलेच नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील हिंदुत्व शिवसेनेने कधीच सोडले आहे. त्यांचे नेते हिंदुत्व फक्त आता बोलतात, डायलाॅगबाजीतूनच त्यांचे हिंदुत्व दिसते, असा चिमटा देखील फडणवीस यांनी काढला.

Devendra Fadanvis-Uddhav Thackeray
अब्दुल सत्तारांकडून पुन्हा `टोपी`..

शिवसेनेचे नेते संजय राऊत हे नटसम्राट आहेत, कारण ते सकाळी एक, दुपारी दुसरे आणि रात्री तिसरंच काहीतरी बोलतात, त्यामुळे त्यांच्या टीकेला आम्ही गांभीर्याने घेत नाही. राष्ट्रवादी काॅंग्रेसने नगरपंचायत निवडणुकीत मनी आणि मसल पावरचा वापर केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. विशेषतः कर्जमध्ये उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना दबाव आणून माघार घ्यायला लावली. पण कितीही दबाव, पैशाचा वापर केला तरी कर्जतची जनता पुढच्या निवडणुकीत प्रा. शिंदे यांच्या पाठीशीच उभी राहिल,असा विश्वास देखील फडणवीस यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com