Dr.Bhagwat Karad News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वास्थ केंद्राचे उद्घाटन

Marathwada : मराठवाड्याच्या या राजधानीलगत १८ ते २० हजार केंद्रिय कर्मचारी आहेत.
Dr.Bhagwat Karad News
Dr.Bhagwat Karad NewsSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : देशात सर्वोत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी केंद्र शासन कटिबध्द असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून गावा गावात स्वास्थ सुविधा पोहचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया (Mansukh Mandviya) यांनी सांगितले. आज केले. जीएसटी भवन येथे केंद्रीय स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते स्वास्थ केंद्राचे ऑनलाईन उद्‌घाटन झाले.

Dr.Bhagwat Karad News
Assam-Meghalaya Clash : कर्नाटक-महाराष्ट्रानंतर आता 'या' दोन राज्यात सीमावाद पेटला ; एका गावामुळे..

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, (Dr.Bhagwat Karad) सहकार मंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील आदी उपस्थित होते. स्वास्थ केंद्रामुळे मिळणाऱ्या आरोग्य सुविधाबाबत आनंद होतोय असे सांगून डॉ. मांडविया म्हणाले, केंद्र सरकार देशातील प्रत्येक गावात दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी सातत्याने काम करते आहे. (Marathwada) सहजतेने उपलब्ध होणाऱ्या चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.

छत्रपती संभाजीनगर व कोईमतूर येथे स्वास्थ केंद्राची सुरूवात झाल्याने या परिसरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना या सुविधा मिळणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हे स्वास्थ केंद्र महत्वपूर्ण ठरेल. निरोगी भारतीय हेच देशाचे भवितव्य असल्याचेही त्यांनी सांगितले. अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड म्हणाले, छत्रपती संभाजीनगर हे एक औद्योगिक शहर तसेच मराठवाडयाची राजधानी आहे. मराठवाड्याच्या या राजधानीलगत १८ ते २० हजार केंद्रिय कर्मचारी आहेत.

या कर्मचा-यांची गेल्या अनेक वर्षापासूनची या स्वास्थ केंद्राची मागणी आज पुर्ण होतेय, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. स्वास्थ केंद्रामुळे केंद्रीय कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाने प्रत्येक क्षेत्रासह आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती केली आहे.

कोरोना कालावधीत आपल्या देशात दर्जेदार आरोग्य सुविधा दिल्या गेल्या. लसीकरणातही देशाने चांगली कामगिरी केली आहे. आरोग्य क्षेत्रातील अनेक नवनवीन उपकरणांचाही पुरवठा गतीने करून कोरोनावर आपण मात केली आहे. केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेतून पाच लाखापर्यंत विमा कवच देण्यात आले असून याचाही लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com