Ips Transfer News : खाडे जालन्याला, महावरकर नांदेड परिक्षेत्राचे नवे उपमहानिरीक्षक..

Nanded : निसार तांबोळी यांची मुंबईला बदली झाल्यानंतर अनेक दिवसांपासून ही जागा रिक्त होती.
Ips Transfer News, Marathwada
Ips Transfer News, MarathwadaSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० आयपीएस अधिकारी आणि २ राज्य पोलिस सेवेतील उपायुक्ता दर्जाच्या अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. यामध्ये नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून एस.एच. महावरकर (S.H.Mahavarkar) यांना तर अमरावती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधिक्षक राहूल खाडे यांना जालन्याचे अपर पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

Ips Transfer News, Marathwada
Ambadas Danve News : राऊतांचे समर्थन नाही, पण विरोधी पक्षाने कोणता देशद्रोह केला हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे..

नांदेड (Nanded) परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक (आयजी) म्हणून शशिकांत महावरकर यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या आठ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. (Jalna) यामध्ये राज्यातील एकूण ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने काढले आहेत.

नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची मुंबईला बदली झाल्यानंतर अनेक दिवसांपासून ही जागा रिक्त होती. मध्यंतरी काहीकाळ औरंगाबादच्या आयजींना पदभार देण्यात आला होता. आता नांदेडला आयजी म्हणून एस. एच. महावरकर यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

या शिवाय आयपीएस बिपिन कुमार सिंह यांची मुंबई येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आयपीएस प्रभात कुमार यांची अपर पोलीस महासंचालक व उपमहासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र, मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

विनीत अग्रवाल यांची अपर पोलीस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी, म्हाडा, मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राजकुमार व्हटकर यांची विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र, मंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com