मराठवाडा विद्यापीठात कोट्यवधींची अनियमितता; उच्च शिक्षणमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट

संलग्नीकरण शुल्क नोंद वहीमध्ये १७.९६ कोटीच्या नोंदी नसणे, विनानिविदा २६.५२ कोटींची खरेदी, सदोष खरेदी प्रक्रियेद्वारे उच्चदराने विद्यापीठाचे ६.८६ कोटींचे नुकसान, ४.६७ कोटींचा निधी अतिरिक्त प्रदान.
Koshyari-Samant
Koshyari-SamantSarkarnama

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कोट्यवधी रुपयांची अनियमितता, विद्यापीठांची लेखापरीक्षणाबाबतची दिरंगाई आदी विषयांवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी (ता. ९) राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच आदर्श महाविद्यालयांसोबत लोणेरे येथील तंत्रज्ञान विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी होत असलेल्या दिरंगाईवर राज्‍यपालांनी निर्देश द्यावेत, अशी मागणी सामंत यांनी राज्यपालांकडे केली.

राज्यातील विद्यापीठांकडून लेखापरीक्षण करून त्यांचे वार्षिक लेखे आणि अहवाल हे राज्य विधानमंडळात सादर करणे बंधनकारक आहे. तरीही अनेक विद्यापीठे त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अनियमितता वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने उच्चस्तरीय समिती गठित करण्याचा मानस सामंत यांनी व्यक्त केला.

राज्य विद्यापीठ कलम ८(८) आणि १३५(५) मधील तरतुदींनुसार प्रत्येक विद्यापीठाचे शासन मान्यताप्राप्त लेखापरीक्षकांमार्फत किंवा महालेखापालांमार्फत लेखापरीक्षण करण्यास सहमती देण्याची मागणीही सामंत यांनी राज्यपालांकडे केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कोट्यवधी रुपयांच्या नोंदी नसल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यावर राज्य सरकारच्या धामणस्कर समितीच्या अहवालामध्ये अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवली गेली. हा अहवाल सामंत यांनी राज्यपालांना सादर केला.

त्यात संलग्नीकरण शुल्क नोंद वहीमध्ये १७.९६ कोटीच्या नोंदी नसणे, विनानिविदा २६.५२ कोटींची खरेदी, सदोष खरेदी प्रक्रियेद्वारे उच्चदराने विद्यापीठाचे ६.८६ कोटींचे नुकसान करणे, सदोष प्रदानाद्वारे ४.६७ कोटींचा निधी अतिरिक्त प्रदान करणे आदी अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आल्याची माहिती राज्यपालांना देण्यात आली.

Koshyari-Samant
"त्यांना जातीयवादाची काविळ" : पेशवाईच्या फोटोवर अमोल कोल्हेंनी सुनावलं

राज्यात आठ वर्षांपासून सात आदर्श महाविद्यालयांसाठी मान्यता देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठांतर्गत आंबडवे, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी, तळेरे, जि. सिंधुदुर्ग तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठांतर्गत श्रीवर्धन, जि. रायगड येथील आदर्श महाविद्यालये आठ वर्षांच्या कालावधीनंतर रखडली आहेत. याबाबत विद्यापीठाला आदर्श महाविद्यालय तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्यपालांनी द्यावेत, अशी विनंतीही सामंत यांनी राज्यपालांकडे केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com