"त्यांना जातीयवादाची काविळ" : पेशवाईच्या फोटोवर अमोल कोल्हेंनी सुनावलं

'पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे, पण शिवरायांचा इतिहास का नाही'
Amol Kolhe
Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

पुणे : खासदार अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी मागील आठवड्यात पुण्याच्या विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांची चित्र दिसत नसल्याने सोशल मिडीयावर प्रश्न विचारला होता. 'पुणे विमानतळावर पेशवाईची चित्रे, पण शिवरायांचा इतिहास का नाही', पुणे एअरपोर्ट आॅथॅरिटीला विसर पडला की काय? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यासाठी त्यांनी पेंटिंग्जसोबतचा सेल्फी आणि एक फोटोही ट्विट केला होता.

यावरुन अनेकांनी त्यांच्यावर फोटोंकडे जातीवाचक चष्म्यातून बघत असल्याची टिका केली होती. मात्र या सगळ्या टिकाकारांना आता त्यांनी पुन्हा एकदा सोशल मिडीयामधूनच "जातीयवादाची काविळ झाली असल्याचे" सुनावत उत्तर दिले आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

आपल्या ट्विटर पोस्टमध्ये डॉ. अमोल कोल्हे म्हणतात, गेल्या आठवड्यात पुणे विमानतळावर पोहचल्यानंतर माझं लक्ष काही पेंटिंग्जने वेधले. ज्या पुणे जिल्ह्यात किल्ले शिवनेरीवर रयतेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यांचे कर्तृत्व का दिसत नाही, अशी भावना ट्विटमधून व्यक्त केली होती. तसेच या संदर्भात एक व्हिडीओ प्रसारित करुन माझी भूमिका स्पष्ट केली होती.

मात्र या पोस्टवर काही जणांनी जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. त्यामुळे हे सर्व प्रकरण दुर्दैवी व अत्यंत लाजीरवाणे आहे असे वाटते. खरंतर प्रत्येक गोष्टीकडे आपण जातीयवादाच्याच समीकरणातून पाहणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून मी जे निरीक्षण केले, त्याबद्दल भूमिका मांडली. कारण कोणत्याही शहरातील, जिल्ह्यातील विमानतळ हे पर्यटनाचे केंद्रबिंदू असते.

त्यामुळे त्या भागातील महत्वाच्या अशा सर्वच प्रतीकांचे समान रिप्रेझेंटेशन व्हावे ही भूमिका होती. आपल्या पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान व छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान व बलिदान स्थळ आहे. किल्ले सिंहगड, किल्ले पुरंदर, किल्ले राजगड असा ऐतिहासिक वारसा आहे.

त्याचबरोबर अनेक धार्मिक, सांस्कृतिक व महत्त्वाच्या वास्तू व लोककला आहेत यांचेही रिप्रेझेंटेशन विमानतळावर व्हावे हा निर्मळ हेतू यामागे होता. यात कोणताही जातीवाद येत नाही व ज्यांना दिसत असेल त्यांचा हेतू स्पष्ट नाही किंवा त्यांना जातीवादाची कावीळ झाली आहे असे म्हणावे लागेल, अशी टिकाही अमोल कोल्हे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com