MLA Prakash Solanke News : मराठा समाजामुळेच चार वेळा आमदार; माझा कोणावरही राग नाही...

Maratha Reservation : आंदोलकांच्या भावना इतक्या तीव्र होत्या, की त्यांच्याशी चर्चा किंवा तसा प्रयत्न करण्याचा प्रश्नच नव्हता.
MLA Prakash Solanke News
MLA Prakash Solanke NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political : माजलगावचे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया समोर आली आहे. (Maratha Reservation Protest) एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल आपला कुणावरही राग नाही, मी पण मराठा आमदारच आहे. मराठा आरक्षणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे, मी यापूर्वीही माझी भूमिका स्पष्ट केली आहे.

MLA Prakash Solanke News
मराठा आंदोलकांचा हल्लाबोल ; आमदार सोळंकेंच्या घरात घुसून टोकाचं पाऊल | MLA Prakash Solanke

परंतु माझ्या ऑडिओ क्लिपची मोडतोड करून अर्धवट दाखवण्याचा प्रयत्न राजकीय विरोधकांनी केला आहे. (Beed) राजकीय विरोधक अशा संधीच्या शोधात असतात आणि त्यांनी ती हेरली. त्यामुळे माझा आंदोलकावर कुठलाही राग नाही. समाजाच्या भावना मराठा आरक्षणाबद्दल तीव्र आहेत, त्या मी समजू शकतो, असेही आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी म्हटले आहे.

मराठा समाजामुळेच मी चार वेळा आमदार होऊ शकलो, त्यामुळे मराठा आरक्षणाला माझा विरोध असण्याचे काही कारण नाही. (Marathwada) आज सकाळीच माझ्या घरावर हल्ला झाला. चारही बाजूंनी घराला घेराव घालण्यात आला होता. प्रचंड दगडफेक करण्यात आली. घराच्या आवारात असलेल्या वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मी माजलगावमध्ये आणि घरातच होतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोळंकेंच्या घराबाहेर बंदोबस्त

आंदोलकांच्या भावना इतक्या तीव्र होत्या, की त्यांच्याशी चर्चा किंवा तसा प्रयत्न करण्याचा प्रश्नच नव्हता, पण झाल्या घटनेबद्दल मला काही बोलायचे नाही. समाजाच्या भावना मी समजू शकतो. त्यामुळे कोणत्याही आंदोलकाबद्दल माझ्या मनात राग नसल्याचा पुनरुच्चारही प्रकाश सोळंके यांनी केला. मराठा आरक्षणासंदर्भात एका तरुणाने आमदार प्रकाश सोळंके यांना फोन केला होता. या दरम्यान झालेल्या संभाषणाची ऑडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती.

त्यात प्रकाश सोळंके यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून भाष्य केले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी आज सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर हल्ला चढवला. यात सोळंके यांच्या घराचे आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण जमाव मोठा असल्याने ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सध्या सोळंके यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, माजलगावमध्ये तणावाचे वातावरण आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com