Lok Sabha Election 2024: उमेदवारांना हवाय साधु-संतांचा आशिर्वाद, श्री श्री रविशंकर यांच्या दानवेंना विजयासाठी शुभेच्छा!

Jalna Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) सर्वच पक्षातील उमेदवारांमध्ये सध्या साधु-संत-महंतांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी स्पर्धा लागल्याचं पाहायला मिळच आहे.
Sri Sri Ravi Shankar, Raosaheb Danve
Sri Sri Ravi Shankar, Raosaheb DanveSarkarnama

Jalna Lok Sabha Constituency: लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) उमेदवारांमध्ये सध्या साधु-संत-महंतांचे आशिर्वाद मिळवण्यासाठी स्पर्धा लागली आहे. दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील बहुतांश उमेदवारांनी वेरुळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर व लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगीरी महाराज (Shantigiri Maharaj) यांच्या दर्शनासाठी वेरुळच्या मठात धाव घेतली होती.

महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), एमआयएमचे इम्तियाज जलील, अपक्ष अशा सर्व उमेदवारांना निवडणुकासाठी त्यांचा पाठिंबा रुपी आशिर्वाद हवा आहे. अशातच जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणूक लढवत असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना श्री श्री रविशंकर यांनी फोनवरून विजयासाठी आशिर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दानवे यांनी आपण सहाव्यांदा निवडणूक लढवत आहोत, पाचवेळा जालना (Jalna) मतदारसंघातून निवडून आलो असल्याचे सांगत तुमचा आशिर्वाद असू द्या, अशी विनंती केली. यावर 'आप फिरसे जीतोगे' असे म्हणत रविशंकर यांनी दानवेंना जालन्यात आल्यावर भेटण्याचे आश्वासन दिले. आर्ट ऑफ लिव्हींगचे संस्थापक श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांचे सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांशी चांगले संबंध आहेत.

कुठल्या ना कुठल्या निमित्ताने राजकीय पक्षांचे नेते, खासदार, आमदार त्यांना भेटत असतात. सध्या देशभरात निवडणूक प्रचाराचा धडका सुरू आहे. मराठवाड्यातील जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठीचा प्रचार आज सायंकाळी पाच वाजता संपत आहे. त्यामुळे आपापल्या मतदारसंघात उमेदवारांचे मोठे शक्ती प्रदर्शन सुरू आहे. आर्ट ऑफ लिव्हींगचा सेवाभावी परिवार सर्व स्तरातील मानसिकदृष्ट्या, शारिरीकदृष्ट्या दुर्बल घटकांचे जिवनमान उंचविण्यासाठी काम करतो.

Sri Sri Ravi Shankar, Raosaheb Danve
Sunil Kedar : काँग्रेसचा आमदार अजितदादांना भिडला; ओपन चॅलेंज देत म्हणाला, 'त्यांनी नागपूरला यावं नाहीतर मी बारामतीमध्ये येतो अन्...'

अशावेळी रावसाहेब दानवे यांनी अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना फोनवरून निवडणुकीसाठी आशीर्वाद मागितले. रविशंकर यांनी रावसाहेब दानवे यांना दूरध्वनीद्वारे लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील भाजपचे अंत्योदय म्हणजे दुर्लक्षित, वंचित घटकाचा, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा शाश्वत विकास हे अंतिम ध्येय ठेवूनच कार्य करते आहे, म्हणून श्री श्री रविशंकर यांचे मार्गदर्शन, शुभेच्छा व आशिर्वाद खुप मोलाचे आहेत. त्यांना जालना येथे येण्याचे निमंत्रण दिलं आहे, असं दानवेंनी सांगितलं.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com