Raosaheb Danve News
Raosaheb Danve NewsSarkarnama

Jalna Lok Sabha Constituency : उन्हापासून बचावासाठी खबरदारी, पण दानवेंच्या लूकची चर्चा भारी..

Raosaheb Danve News : रावसाहेब दानवे .यांचा खतरनाक लूक; उमेदवारी अर्ज बाजूला पण, दानवेंच्या लूकचीच

Chhatrapati Sambajinagr News : रावसाहेब दानवे यांचे किस्से आणि त्यांचा पेहराव राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय ठरत आला आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करतांना आज कडक उन्हापासून बचाव करतांना दानवे यांनी चांगलीच खबरदारी घेतली. डोक्यावर टोपी, कानाला रुमाल त्यावर भले मोठे उपरणे, डोळ्यावर काळा गाॅगल अन् गळ्यात हारांच्या माळा. उमेदवारी अर्ज दाखल करताना दानवे यांच्या या खतरनाक लूकचीच सर्वाधिक चर्चा होती.

यामागे कारणही तसेच आहे, पाच वर्षापुर्वी ऐन लोकसभा निवडणुकीत सनस्ट्रोक झाल्याने रावसाहेब दानवे यांना प्रचारच करता आला नव्हता. आठवडाभरापेक्षा जास्त काळ त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले होते. यावेळी मात्र दानवे यांनी कुठलीच रिस्क न घेता उन्हापासून बचावासाठी चांगलाच बंदोबस्त केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raosaheb Danve News
Jalna Lok Sabha Constituency : काळेंच्या उमेदवारीने जालन्याची लढत रंगतदार वळणावर, पण दानवे म्हणतात मी रिलॅक्स...

दानवे यांच्या शक्ती प्रदर्शनाच्या मिरवणूकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार, संभाजीनगर चे पालकमंत्री तथा लोकसभा महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे, आमदार नारायण कुचे, संतोष दानवे व महायुतीचे आजी-माजी आमदार, पदाधिकारी सहभागी झाले होते.

महायुतीचे दानवे (Raosaheb Danve) यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे डाॅ. कल्याण काळे हे मैदानात आहेत. काळे यांनीही शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रावसाहेब दानवे हे जालन्यातून विजयी षटकार ठोकण्याच्या तयारीत आहेत, तर काळे यांना 2009 मध्ये थोडक्यात हुकलेला विजय यावेळी मिळवायचा आहे.

Raosaheb Danve News
Lok Sabha Election 2024 : दानवे खैरेंकडे पाहत म्हणाले, 'साहेबांनी माझं पद काढण्याचा खूप प्रयत्न केला पण...'
Raosaheb Danve News
Loksabha Election 2024 : काँग्रेसने जाहीर केली चौथी यादी; जालना, धुळे मतदारसंघातील उमेदवारांची केली घोषणा!

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) अशी थेट लढत जालन्यात होणार असल्याने याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. जालन्याच्या निवडणुकीत पंधरा वर्षापुर्वी दानवेंना कडवी झुंज देणारे काँग्रेसचे कल्याण काळे पुन्हा मैदानात उतरल्याने 2009 च्या निवडणुकीची चर्चा नव्याने होऊ लागली आहे.पण दानवे यांनी मात्र आता देश, राज्य आणि जालना लोकसभा मतदारसंघ बदलला आहे, असा दावा करत आपला विजय विकासकामांच्या जोरावर पक्का असल्याचे सांगत आहेत. तर काळे यांनी मी जनतेचा तर दानवे हे मोदींचे उमेदवार असल्याचे सांगत `अब की बार काँग्रेस`चा नारा दिला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com