Jalna Maratha Protest : जखमी आंदोलकांना भेटण्यासाठी शरद पवार, उदयनराजे, संभाजीराजे जाणार..; धुळे, संभाजीनगरमध्ये एसटी बसची जाळपोळ

Maratha reservation : बीड, हिंगोली, धाराशिव लातूरमध्ये मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे
Jalna Maratha Protest news
Jalna Maratha Protest news Sarkarnama

Jalna : जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरु असणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर राज्यभर या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. आंदोलक जखमींना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार उदयनराजे भोसले, स्वराज्यप्रमुख, माजी खासदार संभाजीराजे जालना येथे जाणार आहेत. (Jalna Maratha Andolan news update)

Jalna Maratha Protest news
Jalna Maratha Protest : लाठीचार्ज करणाऱ्या घमेंडिया मस्तवाल सरकारची मस्ती उतरविण्याची आली वेळ,अंतरवली घटनेवर रोहित पवार संतापले

यात ३० पोलीस तर अनेक २० आंदोलक जखमी झाले आहेत. बीड, हिंगोली, धाराशिव लातूरमध्ये मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे. काल (शुक्रवारी) रात्री कोल्हापूर व छत्रपती संभाजीनगर आगारातील एसटी गाड्याची तोडफोड करण्यात आली आहे. आज नाशिक, मुंबई येथे मराठा समाजाची बैठक होत आहे. बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घटना दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जालन्यातील आंदोलन अमानुष पद्धतीनं मोडून काढण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा निषेध मराठा समाजाने केला आहे.

Jalna Maratha Protest news
Nitish Kumar News : देशातील मीडियाने मोदींपासून स्वतंत्र व्हावे ; नितीश कुमारांचे माध्यमांना आवाहन

"मराठा आरक्षण प्रकरणी सरकारनं समाजाचा अंत पाहू नये," असा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे."राज्याच्या गृहमंत्र्यांच्या मनात काही घटकांबद्दलची जी भावना आहे ती पोलिसांच्या कृतीतून व्यक्त होत असते. पोलिसांना वरून आदेश आले, अशी प्रतिक्रिया काल (शुक्रवारी) शरद पवारांनी दिली आहे. त्यांनी केले.

आज अंबड चौफुलीजवळ सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेवराई, संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस डेपोत ठेवल्या असून सोडलेल्या नाहीत.गेवराईतून पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या बसेस सध्या बंद आहेत. रस्ता सुरळीत होईल तेव्हा सोडण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com