Jalna Maratha Andolan : "आता लोकांना हात लावला तर..."; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

Uddhav Thackeray, Ashok Chavan In Jalna : हे सरकार निर्घृण असून त्यांना किंमत मोजावी लागणार
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Jalna Political News : जालन्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात चार दिवसांपासून मराठा समाजाच्या वतीने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर अचानकच शुक्रवारी सांयकाळी पोलिसांनी लाठीहल्ला केला. यात ३५० हून अधिक आंदोलक तर सुमारे ३५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा प्रकाराला सरकार जबाबदार असल्याचा विरोधकांनी आरोप केले. जखमी आंदोलकांची शनिवारी दिवसभर खासदार शरद पवार, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे यांनी भेट घेऊन विचारपूस केली. यानंतर रात्री उशिरा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आंदोलनस्थाळाला भेट दिली. (Latest Political News)

"महाविकास आघाडीच्या सरकारवेळीही मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. आझाद मैदानवरही आंदोलन झाले. त्यावेळी हेच पोलीस होते, मात्र आंदोलकांवर लाठ्या चालल्या नाहीत. हे सरकार निर्घृण आहे, त्यांना याची किंमत चुकवावी लागेल. आता आंदोलकांनी असा काय गुन्हा की सरकारने त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. यापुढे जर येथील लोकांच्या केसाला धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र येथे आणून बसवेल. तसेच आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले पाहिजे", असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिला आहे.

Uddhav Thackeray
Jalna Maratha Andolan : लोकशाहीचा 'जालियानवाला बाग ते जालना' प्रवास; राष्ट्रवादीचा सरकारवर हल्लाबोल

केंद्र सरकारने गणपतीच्या दिवसातच विशेष आधिवेशन बोलावल्याचे सांगून, ठाकरेंनी भाजपची चांगलीच कोंडी केली. ते म्हणाले, "यापूर्वी दिल्ली सेवा विधेयकावर तुम्ही पाशवी बहुमताच्या जोरावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला आहे. त्याच पद्धतीने मराठा आरक्षणाचाही निर्णय घ्यावा. धनगर, ओबीसी समाजालाही न्याय द्यावा. दिल्ली सेवा बिलावेळी आम्ही विरोध केला होता, आता बिनशर्त पाठिंबा देतो", असे आव्हान देत Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांना लक्ष्य केले.

Uddhav Thackeray
Aditya Thackeray News : महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या खोके सरकारने राजीनामा द्यावा ; आदित्य ठाकरे गरजले

राज्यात आता 'एक फूल दोन हाफ' असे सरकार असले तरी त्यांचा कारभार शून्य आहे. "शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी आंदोलनाची अडगळ नको म्हणूनच हा लाठीचार्ज केला. आंदोलकांना भेटण्याची तुम्हाला कसली भीती आहे. आम्ही निघालो तर जालन्यातील वातावरण तंग असल्याचे निरोप आले होते. मात्र सर्व आंदोलक बांधव आहेत, हे मला माहिती आहे. येथे मी येऊ शकतो, तर एका मागे एक बसलेले तिघे का येऊ शकत नाहीत. येथील आंदोलक चीन किंवा पाकिस्तानचे आहेत का गोळीबार करण्यास? आता येथील लोकांच्या केसाला हात लावला तर अख्खा महाराष्ट्र येथे आणून बसवेन," असा इशाराच ठाकरेंनी सरकारला दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com