Jalna: नेत्यांच्या गावबंदीचं पोस्टर फाडलं, दोन गटात हाणामारी, सरपंचासह सात जण जखमी

Maratha reservation: मध्यस्थी करायला गेलेले सरपंचही गंभीर जखमी
Jalna News
Jalna NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna: मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी केलेले पोस्टर फाडून बोर्ड काढल्यावरून दोन गटात वाद झाला आहे. वादानंतर तुंबळ हाणामारी झाल्याची घटना जालन्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर येथे घडली आहे. सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मराठा समाजाचे सात तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर येथे मराठा आंदोलकांनी नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. गावातील चौकात गावबंदीचं पोस्टर एका बोर्डवर लावलं होतं. गावातीलच दुसऱ्या एका गटाने हे पोस्टर फाडून बोर्ड काढून टाकल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Jalna News
Nagar News: निलेश लंकेंच्या फराळाला निवडणुकीचा 'वास'; लोकसभेसाठी मोर्चबांधणी

सीसीटीव्हीच्या आधारे बोर्ड काढणाऱ्या गावातील एका गटाच्या पुढाऱ्याला जाब विचारण्यात आला. या प्रकारानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत सात मराठा तरुणांसह मध्यस्थी करायला गेलेले सरपंचही गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात बोर्ड काढून मारहाण करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalna News
Uddhav Thackeray: मुंब्रा शाखा कुणाची? आमच्याकडे सगळी कागदपत्रे, ठाकरे गट न्यायालयात...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com