Jalna Political News : घनसावंगीत टोपे, घाटगेंच्या सौभाग्यवतीही उतरल्या मैदानात..

Ghnsawangi : हळंदी कुकंवाच्या माध्यमातून मनिषा टोपे व वैशाली घाटगे सक्रीय झाल्या आहेत.
Tope-Ghatges Wife On fild News, Jalna
Tope-Ghatges Wife On fild News, JalnaSarkarnama

Marathwada : राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार राजेश टोपे आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश करत टोपेंना आव्हान देणारे साखर कारखानदार सतीश घाटगे यांच्या सौभाग्यवती देखील आता मैदानात उतरल्या आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत (Rajesh Tope) टोपे विरुद्ध घाटगे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. याची तयारी त्यांच्या सौभाग्यवतींनी आतापासूनच सुरू केल्याचे चित्र मतदारसंघात दिसत आहे.

Tope-Ghatges Wife On fild News, Jalna
Dhananjay Munde News: काठमांडूत फिरायला गेलेल्या बीडच्या सात तरुणांना लुटले, मदतीसाठी आजारी मुंडेंची धावपळ..

संक्रातींच्या निमित्ताने दोघींनीही हळंदी कुंकवाचे कार्यक्रम ठेवत महिलांशी संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या वाढदिवसांच्या औचित्यांने कीर्तन, शंकरपट, आरोग्य शिबीरे, गरजू विध्यार्थ्याना शैक्षणीक साहीत्य वाटप, हेल्थ कार्ड वाटप, शाखा स्थापन अशा कार्यक्रमाची रेलेचेल सुरू आहे. (Ncp) मतदारसंघातील हे शक्तीप्रदर्शन आणि भरगच्च कार्यक्रम पाहता टोपे यांनी विधानसभेची मोर्चेबांधणी सुरू केल्याचे स्पष्ट होते.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात समृध्दी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी भाजपात प्रवेश करत टोपे यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत घाटगे यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे घाटगेंना सहज घेण्याची चूक टोपे करणार नाहीत. त्यासाठी ते आतापासूनच तयारीला लागले आहेत. त्यांच्या या कामात सौभाग्यवती टोपे देखील त्यांना मदत करतांना दिसत आहेत.

भाजपने घनसावंगीतून सतीश घाटगे यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. गेल्या महिन्यात दौऱ्यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर तशी जाहीर घोषणाच केली होती. त्यामुळे घाटगे यांच्याकडून देखील मतदारसंघात पक्ष प्रवेश सोहळे, शाखा स्थापन, कार्यकर्त्याच्या भेटीगाठी असे कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यांना देखील सौभाग्यवतींची मदत होत आहे.

हळंदी कुकंवाच्या माध्यमातून मनिषा टोपे व वैशाली घाटगे सक्रीय झाल्या आहेत. महिलांना वाण म्हणून साखरेचे वाटप केले जात आहे, तर हा उपक्रम दोघींनीही थेट ऊसतोड कामगारांच्या फडात नेला आहे. महिलांना भेट वस्तू व फराळाचे वाटप करत त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न दोघींकडूनही सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com