Jalna ZP News : जालना जिल्हा परिषदेत एक सदस्य वाढणार! संख्या आता 57 वर..

A new group emerges in Jalna Zilla Parishad, raising the member count to 57. : प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण 35 हरकती आल्या होता. या 35 हरकतींवर विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेतली.
Jalna ZP News
Jalna ZP NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जालन्याची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्यानूसार जिल्हा परिषदेचा एक गट वाढला असून आता सदस्यांची संख्या 57 होणार आहे. तर पंचायत समितीचे 114 गण असणार आहे. प्रभाग रचना घोषित झाल्याने आता राजकीय पक्षांच्या तयारीला वेग येणार आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

जाहीर झालेल्या अंतिम प्रभाग रचनेत एक गट आणि दोन गण वाढल्याने आता जिल्हा परिषदेमध्ये (Zilla Parisad) 57 सदस्य निवडून येणार आहेत. तर, गणांतून 114 सदस्य निवडून येणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली होती. त्यानंतर प्रारूप प्रभाग रचनेवर एकूण 35 हरकती आल्या होता.

या 35 हरकतींवर विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेतली. त्यानंतर शुक्रवारी (ता.22) जिल्हाधिकारी आशिमा मिलत्त यांनी जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांची अंतिम प्रभाग रचना घोषित केली. (Jalna) यामध्ये हेलस गट वाढल्याने पूर्ण 56 गट असलेली जिल्हा परिषद आता 57 गटांची झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये एकूण 57 सदस्य निवडून येणार आहेत. तर, पंचात समितीच्या दोन गणांमध्ये वाढ झाल्याने 114 गण झाले आहेत. यामध्ये हेलस गट वाढल्याने हेलस आणि उमरखेडा हे गण वाढले आहेत.

Jalna ZP News
Jalna News : आंदोलकाच्या कंबरेत 'फिल्मी स्टाईल' लाथ घालणं अंगलट; जालन्याच्या पोलिस अधिकाऱ्याला दणका

या नव्या प्रभाग रचनेत घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे नगरपंचायत अस्तित्वात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतून तीर्थपुरी गट उडाला आहे. तीर्थपुरीच्या जागी जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग हा नवीन गट तयार झाला आहे. जिल्हा परिषदेचे गट आणि गणांची अंतिम प्रभाग रचना घोषित झाल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खरी सुरवात होणार आहे.

Jalna ZP News
OBC Reservation update : ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वात मोठी बातमी; महापालिका, ZP निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार 27 टक्के आरक्षणासह होणार

जिल्ह्यातील तालुकानिहाय गट

जालना : देवमूर्ती, नेर, सेवली, पीरकल्याण, मौजपुरी, भाटेपुरी, रेवगाव, वाघ्रुळ जाहांगीर, रामनगर,

भोकरदन : वालसावंगी, पारध बु., जळगाव सपकाळ, आन्वा, वालसा वडाळा, आव्हाना, सोयगावदेवी, नळनी बु., हसनाबाद, चांदई ठोंबरी, राजूर

बदनापूर : बावणे पांगरी, गेवराई बाजार, शेलगाव, रोषनगाव, दाभाडी

जाफराबाद : जवखेडा ठेंग, वरूड बु, माहोरा, सिपोरा अंभोरा, टेंभुर्णी, अकोलादेव.

मंठा: तळणी, जयपुर, केंधळी, खोराड सावंगी, पांगरी गोसावी, हेलस.

परतूर : पाटोदा माव, वाटूर, कोकाटे हदगाव, सातोना खुर्द, आष्टी.

घनसावंगी : राणी उंचेगाव, गुरुपिंपरी, अंतरवाली टेंभी, रांजणी, मच्छिंद्रनाथ चिंचोली, कुंभार पिंपळगाव, राजाटाकळी.

अंबड : रोहिलागड, धाकलगाव, साष्टपिंपळगाव, पारनेर, ताडहदगाव, पारनेर, जामखेड, गोंदी, शहागड.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com