Farmers Leader Join BRS News : जयाजी सुर्यवंशींसह अनेक शेतकरी नेते बीआरएसमध्ये दाखल..

Marathwada : जयाजी सुर्यवंशी हे अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने राज्य पातळीवर देखील केली.
Farmers Leader Join BRS News
Farmers Leader Join BRS NewsSarkarnama
Published on
Updated on

k.Chandrashekhar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) (BRS) मध्ये शेतकरी संघटनेच्या मराठवाड्यातील नेत्यांच्या प्रवेशाची अक्षरशः रांग लागली आहे. नांदेड, लोहा येथील सभेनंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या २४ तारखेला होणाऱ्या जाहीर सभेआधीच काल पुन्हा हैदराबादेत शेतकरी नेते जयाजी सुर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला.

Farmers Leader Join BRS News
Paithan Market Committee : एकाच उमेदवाराचे दोन जात प्रमाणपत्र, खंडपीठात याचिका..

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrashekhar Rao) यांनी स्वतः त्यांना पक्षाचा रुमाल गळ्यात घालत पक्ष प्रवेश करून घेतला. (Nanded) शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्याच्या निर्धाराने महाराष्ट्रात पाऊल टाकलेल्या बीआरएसला विशेषतः शेतकऱ्यांच्या विविध संघटना व त्यांच्या नेते, पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत आहे. ही राज्यातील प्रस्थापित पक्षांना धोक्याची घंटा ठरू शकते.

जयाजी सुर्यवंशी हे अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलने राज्य पातळीवर देखील केली आहेत. (Marathwada) देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळात झालेलेले आंदोलन आणि त्यानंतर चर्चेसाठी बोलावलेल्या शिष्टमंडळात सुर्यवंशी यांचा समावेश होता. तेव्हा फडणवीस हे सुर्यंवशी यांच्या कानात काही तरी सांगत असतांनाचे छायाचित्र माध्यमांमध्ये झळकले होते.

त्यानंतर शेतकऱ्यांचे आंदोलन मिटल्याने वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुर्यवंशी हे सक्रीय नव्हते. मात्र बीआरएसचा पर्याय आणि शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांच्यांशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी काल बीआरएसमध्ये प्रवेश केला.

त्यांच्यासह फिरोज पटेल, सीमा राठोड, जगदीश बोंडे, विजय विल्हेकर, अनिल साकोरे, सुनील शिरेवार, कुलदीप बोंडे, सुनील वाकोडे, सुनील पडोळे, कोल्हे, ज्ञानेश्वर गादे, संजय भोसले, उत्तम धोटे, अनिल वाकोडे यांनी देखील बीआरएस सोबत काम करण्याचा निर्णय घेतला. २४ रोजी छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या जाहीर सभेत या सर्वांचा पुन्हा सन्मान केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com