जयंत पाटील म्हणतात, संदीप क्षीरसागर पवार साहेबांचे सर्वात लाडके आमदार..

(Ncp Leader Jayant Patil)विधानसभा निवडणुकीत संदीप क्षीरसागर (Mla Sandip Kshirsagar) यांनी मोठा पराक्रम करून कार्यकर्त्यांच्या विश्वासावर विधानसभेचा मतदारसंघ खेचून आणला.
Jayant Patil With Mla Sndip Kshirsagar
Jayant Patil With Mla Sndip KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

बीड : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर कायमच लक्ष असते. पण, आता खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही क्षीरसागर हे पवारांचे सर्वात लाकडे आमदार असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्याच्या निमित्ताने भरसभेत पाटील यांनी हे सर्वांना सांगून टाकले.

दिल्ली ते मुंबई पवारांच्या चार्टेड प्लेनमध्ये संदीप क्षीरसागरांना सीट असेल किंवा विकास कामांच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घालून देणे असेल. राज्यातील विविध मंत्र्यांना संदीप क्षीरसागर यांच्या मागण्यांची दखल घेण्याची सुचना शरद पवारांकडून दिली जाते. यावरुन संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या गुडबुकमध्ये असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.

त्याचे कारण पवारांविरुद्ध बंड करणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांच्या पराभवासाठी खुद्द पवारांनी लक्ष घातले आणि संदीप क्षीरसागर यांना बळ दिले होते. क्षीरसागर यांनीही याची जाण ठेवली आणि फडणवीस - पवार अल्पकाळाच्या सरकारची स्थापना होताच क्षीरसागर यांनी शरद पवारांच्या ताफ्यात उडी घेत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

तेव्हापासून शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांची संदीप क्षीरसागर यांच्याबाबत सकारात्मक भूमिका दिसते. आता त्यावर प्रदेशाध्यक्षांनीही शिक्कामोर्तब केले. जयंत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत लहान वयात संदीप क्षीरसागर यांनी मोठा पराक्रम करून कार्यकर्त्यांच्या विश्वासावर विधानसभेचा मतदारसंघ खेचून आणला.

Jayant Patil With Mla Sndip Kshirsagar
पोटनिवडणूक चव्हाणांसाठी प्रतिष्ठेची, तर भाजप पंढरपूर फार्म्युल्याच्या तयारीत..

ते बिंदूसराच्या नदीवरील पुलासाठी, खांडेपारगाव साठवण तलावाऐवजी निम्न पातळी बंधारे करण्यासाठी आग्रही आहेत. त्यांचे विकासाचे प्रश्न येत्या काळात सोडवले जातील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी आणि पक्ष त्यांच्या सोबत आहोत.

आमदार संदिप क्षीरसागर यांच्या पाठिशी शरद पवार यांची ताकद असून क्षीरसागर पवारांचे लाडके आमदार आहेत,असा आवर्जून उल्लेख करतांनाच बीड मतदार संघाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असा विश्वास देखील पाटील यांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com