Beed Assembly Election : योगेशला साथ देऊन विकासाची थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करा- जयदत्त क्षीरसागर

Jaydutt Kshirsagar speech in Vidhan Sabha election : योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी जयदत्त क्षीरसागर यांची प्रचार सभा
Beed Vidhan Sabha Constituency
Beed Vidhan Sabha Constituency
Published on
Updated on

बीड : खोड मजबूत असेल तर फांद्यांवर लक्ष देण्याची गरज नाही. आपुलकी आणि प्रेमाची दोरी कायम ठेवून कुणावरही अन्याय होणार नाही. जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचा सन्मान कायम राहील. फळ देणाऱ्या फांदीला मतदान करून थांबलेली विकासाची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी डॉ.योगेश क्षीरसागर यांना यशस्वी करा, असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी येथे आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते. जयदत्त क्षीरसागर म्हणाले, सत्तेत संधी मिळाल्यावर साठवण तलाव, मोठे रस्ते, पांदण रस्ते, सिंचन व्यवस्था, आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांद्वारे विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. ही वाटचाल पुढे सुरू ठेवण्यासाठी योगेश क्षीरसागर यांना मतदान करावे.

यावेळी अशोक हिंगे म्हणाले, महायुती सरकारने मराठा समाजासाठी आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राचा प्रश्न मार्गी लावला. परंतु, मागील पन्नास वर्षांत महाविकास आघाडीने मराठा समाजाला फसवले. आता योग्य निर्णय घेऊन योगेश क्षीरसागर यांना विजयी करणे गरजेचे आहे.

प्रभाकर इंगळे यांनी सांगितले की, जयदत्तअण्णांनी संकट काळात आमच्या कुटुंबाला मदत केली. त्यांच्या माणुसकीच्या कामांमुळे आम्ही त्यांना दैवत मानतो आणि त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. महिला नेत्या जयश्री मुंडे म्हणाल्या, जयदत्तअण्णा नेहमीच विचारपूर्वक निर्णय घेतात. त्यांच्या पाठिंब्याचा उमेदवार योग्यच ठरतो. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन डॉ.योगेश क्षीरसागर यांना विजयी करावे.

यावेळी अशोक हिंगे, प्रा.जगदिश काळे, सुधाकर मिसाळ, सुभाष क्षीरसागर, सुलेमान पठाण, जयश्रीताई मुंडे, गणेश घोलप, प्रकाश ईंगळे, उषाताई सरवदे, मिनाताई उगलमुगले, शरद ढाकणे, भगवान पाखरे, माधवराव मोराळे, गहिनीनाथ पाखरे, संजय सानप, सतिश काटे, नवनाथ सानप, वसंत सानप, अभिजीत खाडे, शिवमुर्ती सानप आदींची उपस्थिती होती. अनेक मान्यवरांनी योगेश क्षीरसागर यांना पाठिंबा देण्याचे आवाहन मतदारांना केले. कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य, प्रमुख कार्यकर्ते, मान्यवर, आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com