Osmanabad-Kalamb Assembly Election : गद्दारी केली नाही म्हणून विकासकामांना महायुतीची स्थगिती : कैलास पाटील

Kailas Patil election campaign speech : महायुती सरकारवर कैलास पाटील यांचा जोरदार हल्लाबोल
Osmanabad Kalamb Assembly Election
Osmanabad Kalamb Assembly Election
Published on
Updated on

कळंब : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास पाटील यांनी कळंब तालुक्यातील अनेक गावांत सभा घेतल्या. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर भ्रष्टाचार, विकासकामांतील स्थगिती, शेतकऱ्यांवरील अन्याय आणि केंद्राच्या धोरणांवर टीका केली.

आमदार कैलास पाटील यांनी महायुती सरकारवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या आडून भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप केला. सात महिन्यात कोकणातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. यातून कोट्यवधी रुपयांची कमाई झाल्याचा अंदाज आहे. महायुती सरकार म्हणजे भ्रष्टाचारी सरकार आहे, अशी ओळख या सरकारची झाली आहे, असे ते म्हणाले

मांजरा नदीवरील बॅरेजेस काम, येडशी-कळंब रोड यासारख्या महत्वाच्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली. आम्ही महायुतीसोबत सामील न झाल्याने या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना फक्त नावापुरत्या असल्याचे सांगत पीक विमा योजनेवर टीका केली. ते म्हणाले की, पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या हिताची नसून ती केवळ कंपन्यांच्या नफ्यासाठी राबवली जात आहे. पंतप्रधानांनी ही योजना स्वत:च्या राज्यात का लागू केली नाही. याचा विचार शेतकऱ्यांनी केला पाहिजे.

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या वचनाची आठवण करून देताना त्यांनी दावा केला की, महाविकास आघाडीच्या काळात कोणत्याही अटीशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. सत्ताधाऱ्यांनी दहा वर्षांत कर्जमाफी केली नाही. आता निवडणुकीपूर्वी कर्जमाफीच्या घोषणा करून शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना धोका न देण्याचे वचन देताना सांगितले की, मोदी-शहांच्या राजकीय प्रयोगानंतर पक्ष फोडला, चिन्ह चोरले तरी मी आपल्या मतदारांचा विश्वास न तोडता एकनिष्ठ राहिलो. माझा वारसा जपण्यासाठी मी कधीच गद्दारी करणार नाही. आगामी निवडणुकीत मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com