Bagde-Kale News : काळे तुम्ही ज्या बंगल्यात राहता, तो वडीलांनी बाजार समितीचे चेअरमन असतांना बांधला...

Marathwada : माझ्या नावावर असलेले मुंबई, पुण्यातले बंगले शोधून काढावे, ते मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे.
Haribhau Bagde-Kalyan kale
Haribhau Bagde-Kalyan kaleSarkarnama
Published on
Updated on

Bjp News : भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. (Bagde-Kale News) कल्याण काळे ज्या वडीलांच्या बंगल्यात राहतो असं सांगतात, तो बंगला त्यांनी ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन असतांना बांधला होता, असा टोला बागडे यांनी लगावला.

Haribhau Bagde-Kalyan kale
Ambadas Danve On Kendrekar : केंद्रेकरांना स्वेच्छा निवृत्ती घ्यायला भाग पाडले, दानवेंचा आरोप..

काळे यांनी माझे मुंबई, पुण्यात बंगले असल्याचे सांगितले आहे. माझे त्यांना आव्हान आहे, त्यांनी ते शोधावे मी त्यांच्या नावावर करून देतो, असा जोरदार पलटवार देखील केला. (Bjp) फुलंब्री पंचायत समितीत चारशे सिंचन विहिरींच्या फायली मंजुर करण्यासाठी बागडे आठ तास ठिय्या देवून बसले होते. यावरून कल्याण काळे यांनी कन्नड येथील पत्रकार परिषदेत बागडे (Haribhau Bagde) यांच्यावर टीका करतांना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

एवढेच नाही तर त्यांच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी करा, अशी मागणी देखील केली होती. त्याला करमाड येथे झालेल्या भाजपच्या व्यापारी मेळाव्यात बागडेंनी उत्तर दिले. बागडे म्हणाले, कल्याण काळे (Congress) यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतांना मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगरात माझे बंगले असल्याचे म्हटले होते. तसेच छत्रपती संभाजीराजे साखर कारखाना देखील माझ्या मालकीचा असल्याचा आरोप केला होता.

माझे काळेंना खुले आव्हान आहे, त्यांनी माझ्या नावावर असलेले मुंबई, पुण्यातले बंगले शोधून काढावे, ते मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे. आमदार म्हणून मला अडीच लाखांचे दरमहा उत्पन्न आहे, त्यातच माझे घर चालते. आमदारांना मिळतो तसा मुंबईत मला फ्लॅट मिळाला होता. तो विकूनच मी शहरात घर आणि शाॅपिंग काॅम्पलेक्स बांधले आहे. गावाकडे जी जमीन आहे ती देखील वडिलोपार्जित आहे. त्यामुळे काळे यांनी आरोप करतांना विचारपूर्वक करायला हवा होता.

संभाजीराजे साखर कारखान्याचा मी मालक नाही, तर या कारखान्याचे माझ्याकडे शेअर्स असल्यामुळे मी केवळ सभासद आहे, असे स्पष्टीकरणही बागडे यांनी यावेळी दिले. उलट तुम्ही वडीलांनी बांधलेल्या ज्या बंगल्यात राहत आहात, तो त्यांनी ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन असतांना बांधला होता, हेही लक्षात ठेवावे, असा चिमटा देखील बागडे यांनी काळेंना काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com