Phulambri Assembly Constituency : कल्याण काळे खासदार झाल्याने फुलंब्रीत ‘भावी आमदारां’चे पीक वाढले उदंड!

Assembly Election 2024 : डॉ. कल्याण काळे खासदार म्हणून निवडून आल्याने महाविकास आघाडीकडून इच्छुकाची फुलंब्री विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
Mahavikas Aghadi-Mahayuti
Mahavikas Aghadi-MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Phulambri, 04 July : नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या जालना मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे हे एक लाखाच्या मताधिक्याने विजयी झाले. सलग पाच टर्म खासदार राहिलेले माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा त्यांनी पराभव केला. फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले काळे आता खासदार झाल्यामुळे या मतदारसंघातून विधानसभेवर जाऊ इच्छिणाऱ्या भावी आमदारांचे पीक जोमात आले आहे.

सध्या फुलंब्री (Phulambri ) या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) करत आहेत. येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील असणार आहेत.

याशिवाय भाजपमध्येही (BJP) अनेक इच्छुक निर्माण झाले असून महायुती (Mahyuti), महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी भाजपचा लोकसभेचा किल्ला पोखरून विजयी पताका फडकवली आहे. त्यामुळे आता डॉ. काळे खासदार म्हणून निवडून आल्याने महाविकास आघाडीकडून इच्छुकाची फुलंब्री विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

दुसरीकडे भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे हेच राहणार की नवीन चेहऱ्याला संधी देणार? हे अद्याप गुलदस्तात आहे. असे असले तरीही विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या पक्षातील इतरांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

जालना लोकसभा मतदारसंघात 40 वर्षांनंतर विजय मिळवत काँग्रेसने कमबॅक केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत आत्मविश्वास संचारला आहे. महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. कल्याण काळे खासदार झाल्यामुळे या वेळी विधानसभेला रांगेत असलेल्यांचा विचार पक्षश्रेष्ठींना करावा लागणार आहे.

Mahavikas Aghadi-Mahayuti
Parinay Phuke-Kripal Tumane : फुके, तुमानेंचे राजकीय वजन वाढले; आमदार होण्यापूर्वीच ‘भावी मंत्री’ म्हणून चर्चेत!

महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला असली तरी ऐनवेळी अनेक तडजोडी होऊ शकतात. हे लक्षात घेऊन शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या इच्छुकांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

दुसरीकडे, भाजपचे इच्छुक उमेदवारही मागे राहिले नसून आमदार हरिभाऊ बागडे थांबल्यास आपलीही पूर्ण तयारी पक्षाला दिसावी; म्हणून दुसऱ्या फळीतील इच्छुक पदाधिकाऱ्यांनी आमदारकीच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात आपापली स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

हे आहेत इच्छुक

भाजप : आमदार हरिभाऊ बागडे, सभापती अनुराधा चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाठ, विजय औताडे, सभापती राधाकिसन पठाडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील.

काँग्रेस : सेवादल प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीपराव बोरसे.

शिवसेना शिंदे गट : माजी बांधकाम सभापती किशोर बलांडे, जिल्हाप्रमुख रमेश पवार, तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : तालुकाध्यक्ष राजेंद्र पाथ्रीकर

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) : विधानसभा संघटक अक्षय खेडकर

राष्ट्रवादी (अजित पवार गट) : जिल्हा उपाध्यक्ष नितीन देशमुख

फुलंब्रीसाठी राष्ट्रवादी आग्रही

फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा दोन वेळेस काँग्रेसला सुटला असला तरी काँग्रेसला यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे राजेंद्र पाथ्रीकर हे हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट देऊन त्यांनी याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. राजेंद्र पाथ्रीकर राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी एस काँग्रेसपासून शरद पवार यांच्यासोबत जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला यश येते का? हे पहावे लागणार आहे.

Edited By : Vijay Dudhale

Mahavikas Aghadi-Mahayuti
Sunil Kedar : सुनील केदारांचे राजकीय भवितव्य आता ‘सुप्रीम’च्या हाती!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com