
Mumbai News : वांद्रेच्या कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांच्या तक्रारीत धनंजय मुंडे यांना देखभालीसाठी महिन्याला दोन लाख रूपये देण्याचा आदेश दिला. यानंतर मंत्री मुंडे पु्न्हा चर्चेत आलेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, मुंडे यांच्याकडून झालेल्या त्रासाचा पाढाच वाचला.
येरवडा अन् बीडमधील तुरुंगातील दिवस, बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील केबिनमध्ये वाल्मिक कराडकडून झालेली मारहाण, या सर्व प्रकाराबाबत करुणा मुंडे यांनी खळबळ उडवून देणारे दावे केले आहेत.
करुणा मुंडे म्हणाल्या, "माझ्याकडे आणि माझ्या परिवाराकडे काहीच पैसे नाही. परंतु त्यांच्या (मंत्री मुंडे) नोकरांकडे चार-चार हजार कोटी रुपयांची मालमत्ता निघत आहे. माझ्या घरावरील कर्जाचे हप्ते गेल्या सात महिन्यांपासून थकले आहेत. माझ्या बहिणीसोबत शारीरिक हिंसाचार झाला. माझ्यावर खोटे आरोप करून जेलमध्ये टाकले गेले. 45 दिवस येवरडा तुरुंगात राहिली आहे. कोणी आले नाही मला भेटायला. फक्त आभाळ बघायचे. कोण मला तुरुंगात काढणार? अॅट्रोसिटीसारख्या केसमध्ये मला तुरुंगात ठेवले गेले. बीडसारख्या (BEED) जेलमध्ये मला 16 दिवस ठेवले".
बीड जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण झाल्याचा दावा करताना करुणा मुंडे यांनी दोन कवडीचा गुंडा (वाल्मिक कराड) आज जेलमध्ये आहे. मला जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण केली. मंत्र्यांच्या बायकोसोबत मारहाण केली. मला चुकीच्यापद्धतीने स्पर्श करत होता. महाराष्ट्रातील सीएम देखील काहीच करत नाही. मी आत्महत्याचा प्रयत्न देखील केला. पण मला काहींनी समजावले. मला काही झाल्यास, मुलांना अमेरिकेला पोचवले जाईल. हे राक्षस वाढतील. वाल्मिक कराड याने मारहाण केली. तेव्हा धनंजय मुंडे तिथेच होते. पोलिसवाले तिथे होते. बीडच्या कलेक्टरच्या केबिनमध्ये मारहाण झाली. कलेक्टर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), डिजीकडे निवेदन देत, सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली. आजपर्यंत मला सीसीटीव्ही फुटेज मिळाली नाहीत, असा दावा केला आहे.
'कौटुंबिक हिंसाचार केसवर लढत राहणार आहे. 20 फेब्रुवारी पुढची तारीख आहे. मी, माझी बहीण न्यायालयात येणार आहे. पुराव्यासहीत पुढे जाणार आहे. दबाव खूप केला आहे. खोटेनाटे व्हिडिओ करून पसरवत आहे. काय करायचे ते करा, मी मागे हटणार नाही', असा इशारा देखील करुणा मुंडे यांनी दिला.
'औरंगाबाद न्यायालयात आणखी एक खटला सुरू आहे. माझ्या गाडीत पिस्तूल टाकली होती. त्याप्रकरणी लढाई देखील जिंकली आहे. ती फिर्याद न्यायालयाने रद्द केली आहे. पिस्तूल टाकली होती, त्यात मला तीन वर्षे जेलमध्ये टाकण्याचा कटकारस्थान होते. परळी लोकांनी त्याचे व्हिडिओ काढले आणि समाज माध्यमांवर टाकले. माध्यमांनी न्याय दिला', असेही करुणा मुंडे यांनी म्हटले.
'मी धनंजय मुंडेची पहिली बायको आहे. 27 वर्षे संसार केला आहे. जे नाही आहे, ते देखील माझ्याकडे आहे. निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे. यासंदर्भात नोटीस त्यांना काढण्यात आली आहे. पहिली पत्नी म्हणून माझे नाव टाकलेले नाही. परंतु मुलांचे नाव टाकलेले आहे. त्यांची आमदारकी रद्द व्हायला पाहिजे. परळीची निवडणूक खूप दहशत करून जिंकली आहे. मतदान केंद्र ताब्यात घेऊन मतदान केले आहे. स्वतः मतदान केले. माझ्याकडे खूप काही पुरावे आहेत. मृत लोकांचे देखील मतदान करून घेतले आहेत', असा गंभीर आरोप देखील करुणा मुंडे यांनी केला.
करुणा मुंडे यांनी मालमत्तेत हक्क मिळावा यासाठी न्यायालयात जाणार आहे. खूप काही मालमत्ता आहे. कमीत कमी 500 कोटी रुपयांचा मालमत्ता आहे. मूळ कागदपत्र माझ्याकडे आहे. प्रतिज्ञापत्र देखील लिहून दिले आहे. पण गेल्या तीन वर्षांपासून वाद चालू आहे. परंतु मालमत्ता राजश्री यांच्या नावावर केली आहे. 'बॅग डेड'चे मुंद्राक घेऊन हा प्रकार केला आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात लढणार आहे. आमच्या नावावर एकही मालमत्ता नाही. राजश्रीबरोबर लग्न करताना परवानगी देखील घेतली नव्हती. त्यामुळे मी इंदौरमध्ये होती, असे सांगितले. मला त्यांच्या मंत्रीपदाबाबत काही देणेघेणे नाही. मी खऱ्यासाठी लढत आहे. मी त्यासाठी न्यायालयात लढणार आहे. या खटल्याची माहिती देखील त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या नावावर राजीनामा द्यावा, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.