KCR Meet In Maharashtra : राव यांच्या गळाला लागले महाराष्ट्रातील दोन माजी आमदार : 'बीआरएस'चं मिशन मराठवाडा!

K Chandrashekhar Rao : महाराष्ट्रात आज दुसरी सभा..
K Chandrashekhar Rao :
K Chandrashekhar Rao : Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrasekhar Rao) यांची आज आज महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात जाहीर सभा होत आहे. लोहा तालुक्यात दुपारी दोन वाजता राव यांची सभा पार पडणार आहे. मात्र ही सभा पार पडताना महाराष्ट्रातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यानंतर आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार शंकर आण्णा धोंगडे यांचा ही बीआरएसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.

पक्षप्रवेश आधी माजी आमदार धोंगडे म्हणाले, बीआरएस पक्षाने तेलंगणामध्ये शेतकरी व कष्टकरी लोकांसाठी जो कार्यक्रम राबवला तो इतर कोणत्याही पक्षाने राबवला नाही. म्हणून माझा बीआरएसमध्ये प्रवेश होत आहे, अशी भूमिका धोंगडे यांनी स्पष्ट केली.

K Chandrashekhar Rao :
Harshvardhan Jadhav News : थेट तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेत बीआरएस पक्षात प्रवेश...

यापूर्वी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी के. चंद्रशेखर राव (K.Chandrasekhar Rao) यांची हैदराबादेत भेट घेवून, थेट त्यांच्या पक्षातच प्रवेश केला आहे. जाधव यांनी स्वतः या संदर्भात व्हिडिओ जारी करत माहिती दिली होती.

केसीआर यांच्या नेतृत्वाखाली तेंलगणा सारखे छोटे राज्य शेतकऱ्यांसाठी जे काम करत आहे, तेच महाराष्ट्रातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी करायचे म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे जाधव यांनी म्हटले होते. आता दोन प्रभावशाली माजी आमदारांचा प्रवेश झाल्यामुळे बीआरएस पक्षाला महाराष्ट्रात बळ मिळाले आहे.

K Chandrashekhar Rao :
Uddhav Thackeray In Malegaon : उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावमध्ये धडाडणार : कुणाकुणाचा घेणार समाचार?

बीआरएसचं मिशन मराठवाडा :

आगामी काळात पार पडणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुकीत बीआरएस लक्ष केंद्रित करणार आहे. नांदेड आणि सोलापूर जिल्ह्यातील तेलगू भाषकांची संख्या लक्षणीय आहे. तेलंगण राज्यावर राव यांची मजबूत पकड आहे.

आता केसीआर भारतभर पक्षविस्तारासाठी काम करणार आहेत. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासारखंच त्यांनी राष्ट्रीय स्तरावर नेतृ्त्त्व करणयाची इच्छा. तेलंगणाची रणनीती राष्ट्रीय स्तरावर चालू शकेल का, याची ते चाचपणी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com