Keshavrao Dhondage : पाच वेळा आमदार, एक वेळा खासदार राहिलेले शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन!

Keshavrao Dhondage : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ते 14 महिन्यांसाठी कारावास भोगला.
Keshavrao Dhondage  SKP
Keshavrao Dhondage SKPSarkaranama

Keshavrao Dhondage : एक अत्यंत दुख:द बातमी येथ आहे. शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksh) ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचे निधन झालं आहे. त्यांचे वय १०२ वर्षे होते. औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. या ठिकाणा त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

केशवराव धोंडगे (Keshavrao Dhondge Passed Away) हे मागील अनेक काळापासून महाराष्ट्र विधिमंडळाचे सभासद राहिले. आमदार आणि खासदार म्हणून केशवराव यांनी भूमिका बजावली. अनेक काळ त्यांनी लोकांचं प्रतिनिधित्व केलं.विधानसभेत आमदार म्हणून त्यांची अनेक भाषणे विशेष लक्ष वेधणारी ठरली. लोकांना केंद्रबिंदू मानून लढणारे नेते, अशी त्यांची प्रतिमा होती. धोंडगे हे तब्बल पाच टर्म आमदार राहिले. एकदा ते लोकसभेचे सद्स्य म्हणजे खासदार ही राहिले आहेत. त्यांचं भाषण इतकं प्रभावी होतं की, त्यांना मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जात होते.

Keshavrao Dhondage  SKP
Sandeep Singh : विनयभंगाचा आरोप होताच मंत्र्याचा राजीनामा; राजकीय वर्तुळात खळबळ

कंधार तालुक्यात गऊळ या गावी त्यांचा जन्म झाला. पिचलेल्या, दुर्बल, वंचित समाजाचे समस्या निवारणासाठी ते कायम आग्रही होते. अनेक जनआंदोलनं त्यांनी केली. सरकारला वेळोवेळी धारेवर धरले. खासदार आणि आमदार म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांची विशेष गोष्ट म्हणजे विधानसभेचं कामकाज सुरु होण्यापूर्वी ते सभागृहात येत असत, तर विधानसभा संपल्या नंतर सर्वात शेवटी ते जात असत, हेच त्यांचं वैशिष्ट्य!

Keshavrao Dhondage  SKP
Police News; मावळत्या वर्षात नाशिकला मिळाले तीन पोलिस आयुक्त!

लढ्याचं नेतृत्व :

डॉ.केशवराव धोंडगे यांच्या नेतृत्वात आणीबाणी विरोधी लढा पुकारला गेला. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ते 14 महिन्यांसाठी कारावास भोगला. त्यांनी 1985 मध्ये गुराखीगडाटी स्थापना केली. जागतिक गुराखी साहित्य संमेलन तसेच, जागतिक गुराखी लोकनाट्य संमेलन भरवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com