Sharad Pawar in Killari : भूकंपानंतर मदतीचा हात देणाऱ्या शरद पवारांबद्दल किल्लारीकर व्यक्त करणार कृतज्ञता...

Mahavikas Aghadi News : साहेब आपण केलेली मदत आम्ही लातूरकर कधीही विसरणार नाहीत.
Sharad Pawar in Killari
Sharad Pawar in KillariSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : तीस वर्षांपूर्वी म्हणजेच ३० सप्टेंबर १९९३ रोजी मराठवाड्यातील लातूर व धाराशिव जिल्ह्यात महाप्रलयंकारी भूकंप झाला होता. (Latur Earthquake News) या भूकंपाने किल्लारीमध्ये सर्वाधिक जीवतहानी झाली होती. गणेश विसर्जनाच्या दिवशीच संपूर्ण देशाला हादरवून सोडणारी किल्लीरीतील ही घटना घडली होती. येत्या ३० सप्टेंबर रोजी या घटनेला तीस वर्षे पूर्ण होत आहेत.

Sharad Pawar in Killari
Supriya Sule To Pankaja : पंकजांच्या मदतीला धावल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या, ‘गोपीनाथ मुंडे हयात नाहीत; म्हणून त्यांच्या लेकीशी...’

भूकंपानंतर गावच्या गाव गडप झाले होते, मोठ्या प्रमाणात माणसं, जनावरं दगावली होती. (Marathwada) घरं जमीनदोस्त झाली होती, अशावेळी तातडीने या लोकांना मदत, त्यांच्यावर उपचार, पुनर्वसनाचे काम तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. किल्लारीकरांना या मोठ्या संकटातून पुन्हा हिंमतीने उभे राहण्यासाठी पवारांनी मुख्यमंत्री म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

याबद्दल किल्लारीतील भूकंपाला ३० वर्षे पूर्ण होत असताना किल्लारीवासीयांकडून शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.(Latur) ३० सप्टेंबर रोजी किल्लारीत होणाऱ्या या सोहळ्याला शरद पवार हजर राहणार असून, त्यांची जाहीरसभादेखील क्रांतिकारी मैदानावर होणार आहे. या कार्यक्रम आणि सभेची तयारी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील पक्षाचे पदाधिकारी व किल्लारीतील नागरिक करत आहेत.

यासाठी नुकतीच महाविकास आघाडीची बैठकही घेण्यात आली. ३० सप्टेंबर १९९३ मध्ये लातूर व धाराशिव जिल्ह्यांत झालेल्या भूकंपात अनेक लोकांना झोपेतच आपले प्राण गमवावे लागले होते. लाखो लोक बेघर, अनेक मुले अनाथ झाली आणि होत्याचे नव्हतं झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे क्षणार्धात सगळेच संपले असे वाटत असताना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी थेट किल्लारी गाठून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कामाला लावून मदत केली.

तसेच पुढील काळात जलद गतीने कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. उद्या ३० सप्टेंबर २०२३ रोजी या घटनेला ३ दशके पूर्ण होत आहेत. साहेब आपण केलेली मदत आम्ही लातूरकर कधीही विसरणार नाहीत, या संकल्पनेतून पद्मविभूषण व शरद पवारसाहेब यांचा कृतज्ञता सोहळा शनिवारी सकाळी दहा वाजता क्रांतिकारी मैदान किल्लारी येथे संपन्न होणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com