Vidhan Parisad : शेतकरी, आदिवासींच्या विविध मागण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालेला मोर्चा थांबवून यशस्वी तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मी स्वतः मोर्चाला समोर जावून शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहे. ज्या मागण्या तातडीने मान्य करणे शक्य आहे, त्या जागेवरच मान्य केल्या जातील. पायी चालत येणाऱ्या शेतकरी, आदिवासी बांधवांना मुंबईत यावे लागू नये, असाच आमचा प्रयत्न असल्याचे उत्तर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सरकारच्या वतीने सभागृहात दिले.
शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी पाॅईंट आॅफ इन्फाॅरमेशनच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता. जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, दोन दिवसांपासून हजारो शेतकरी, आदिवासी बांधव नाशिकहून चालत येत आहेत. मात्र अद्याप सरकारने यावर निवेदन केले नाही. याआधी असाच लाॅगमार्चं आला होता, त्यावेळी दिलेले आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसेंनी पाळले नाही.
या आंदोलकांशी तेव्हा करार केला होता, त्याचा मी देखील साक्षीदार आहे. त्यापैकी २५ टक्के मागण्या देखील पुर्ण केलेल्या नाहीत. आज बैठक घेतल्याचे समजते, हा मोर्चा थांबला पाहिजे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. शेतकरी, आदिवाशांचे अशा पद्धतीने प्रदर्शन न करता त्यांच्या ज्या मागण्या जागेवर मान्य करणे शक्य आहे, त्या केल्या पाहिजेत. याआधी त्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले गेले होते.
सरकारने यावर निवेदन करावे, गांभीर्याने चर्चा करून दखल घेतली गेली पाहिजे. मंत्र्यांनी तिकडे जावून हा मोर्चा थांबवला पाहिजे, शेतकरी, आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे असेही पाटील म्हणाले. यावर मंत्री गिरीश महाजन म्हणाले, आदिवासी, शेतकरी, माजी आमदार यांच्याशी चर्चा झाली आहे. मी स्वतः मोर्चाला समोर जावून चर्चा करणार आहे.
सरकार निश्चित प्रयत्न करणार की मोर्चा तिथेच थांबला पाहिजे. त्यांच्या शक्य त्या मागण्या लगेच मान्य करू असेही महाजन यांनी सरकारच्या वतीने सांगितले. नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातून हा मोर्चा रवाना झाला होता. मोर्चेकऱ्यांनी हातात लाल बावटा घेऊन कूच कल्यामुळे रस्ते लालभडक झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.