सुनील इंगळे
Chhatrapati Sambhajinagar : सत्ता आल्यावर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या त्रिकुटाने दिले होते. राज्यातील मतदार, शेतकर्यांनी या नेत्यांवर विश्वास दाखवत त्यांना भरभरून मतदान केले. सत्तेवर येऊन सहा महिने झाले, पण राज्यातील एकाही शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला का? असा सवाल अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ.अशोक ढवळे यांनी केला.
शेतकरी (Farmers) कर्जमाफी, कसेल त्याची जमीन यासह विविध प्रश्नांवर एक जूनला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची घोषणा ढवळे यांनी संभाजीनगरात पत्रकारांशी बोलताना केली. शेतकऱ्यांचा जमीन हक्क अबाधित राखण्यासाठी शहरात अखिल भारतीय किसान सभेची राज्यव्यापी जमीन हक्क परिषद पार पडली. त्यानंतर आज ढवळे यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
भारत स्वतंत्र झाल्यानंतर कसेल त्याला जमीन असा निर्णय घेण्यात आला होता, परंतु 77 वर्ष झाली या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. (Kisan Sabha) यात भूमिहीन, दलित, आदिवासी, भटके विमुक्त जाती समाजाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. मात्र हे प्रश्न सोडविण्या ऐवजी शासनाच्या वतीने 'शक्ती पीठ'हायवे असे विविध महामार्ग आणत असून शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन हडप करत आहेत.
यामध्ये खालपासून ते वरपर्यंत कमिशन आणि टक्केवारीसाठी असे हायवे बनविण्याचा घाट सरकारने घेतल्याचा आरोप ढवळे यांनी केला. शेतकरी व जमीनधारकांना किरकोळ भरपाई देण्यात येत आहे. यासोबतच निवडणुकीच्या काळात युतीच्या सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप या घोषणाची पूर्तता झाली नाही, यामुळे कसेल त्याची जमीन, शेतीमाला हमीभाव व संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी या प्रश्नावर एक जूनला मोर्चा,निदर्शने करण्यात येणारा असल्याचे ढवळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली
भाजप हे भांडवलशाही विचाराचे धोरण स्वीकारते. निवडणुकीमध्ये शेतकर्यांच्या मुद्दा बाजूला ठेवून हिंदू- मुसलमान, भारत- पाकिस्तान तसेच धार्मिक व भावनिक मुद्द्यांकडे लक्ष वेधले जाते. ज्या दिवशी शेतकर्यांच्या प्रश्नांवर निवडणूक लढवली जातील तेव्हाच शेतकरी सुखी होईल, मात्र तसे होत नाही. त्यामुळे धर्मनिरपेक्ष, शेतकर्यांच्या हितावर निवडणुका घ्याव्यात,अशी मागणी डॉ.अजित नवले यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.