Beed Ncp Political News : बीडमधील पवारांच्या सभेतून क्षीरसागर देणार अजितदादांना आव्हान..

Marathwada Political News : शरद पवारांनी आता थांबायचं नाही, लढायचं असा संदेश पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदारांना दिला आहे.
Beed Ncp Political News
Beed Ncp Political News Sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Rally News : अजित पवार यांनी समर्थक आमदारांना सोबत घेऊन राष्ट्रवादीत फूट पाडली. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन मंत्रीपदं मिळवली. मराठवाड्यासह राज्यभरातून अजित पवारांच्या बंडाला मोठा पाठिंबा मिळाला. (Beed Ncp Political News) असे असले तरी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर मात्र शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. आमच्याकडे मंत्रीपद, सत्ता आहे, तिकडे काय आहे? असा सवाल करणाऱ्यांना माझ्याकडे शरद पवार आहेत, असे बाणेदार उत्तर क्षीरसागरांनी दिल्यामुळे त्यांची राज्यभरात चर्चा झाली होती.

Beed Ncp Political News
Cabinet Expansion : राज्यात लवकरच आचारसंहिता; मग मंत्रिमंडळ विस्ताराचा काय फायदा; बच्चू कडूंची नाराजी कमी होईना

बीड (Beed) जिल्ह्यातील राष्ट्रवादी, भाजपचे बहुतांश आमदार सत्तेत असतांना (Sandip Kshirsagar) संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार शरद पवारांसोबत राहिले. एवढेच नाही तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्यासाठी त्यांची कंबर देखील कसली आहे. राष्ट्रवादीचे प्राबल्य असणाऱ्या बीड जिल्ह्यात फुटीनंतर शरद पवारांनी सभा घ्यावी, यासाठी देखील संदीप क्षीरसागर आग्रही होते.

अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून येत्या १७ आॅगस्ट रोजी (Sharad Pawar) शरद पवार हे बीडमध्ये सभा घेणार आहेत. राष्ट्रवादी पक्षामध्ये फुट पडण्याआधीपासून संदीप क्षीरसागर हे शरद पवारांच्या जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात. अजित पवारांनी जिल्ह्यात धनंजय मुंडे यांना कायम झुकते माप दिले, त्यामुळे क्षीरसागर त्यांचापासून अंतर राखून रहायचे. खासदार सुप्रिया सुळे, शरद पवार यांच्याशी थेट संपर्क असणाऱ्यापैकी संदीप क्षीरसागर आहेत.

मतदारसंघातील अनेक प्रश्न त्यांनी थेट मोठ्या साहेबांकडे जाऊन मार्गी लावल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यात नव्याने पक्षाची बांधणी करण्याची मोठी जबाबदारी क्षीरसागर यांच्यावर जिल्हाध्यक्ष म्हणून देखील आली आहे. सत्ता, मंत्रीपद अशा बलाढ्य लोकांशी लढा देत त्यांना मात देण्याचे शिवधनुष्य क्षीरसागरांना पेलणार का? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थितीत केला जात आहे.

शरद पवारांनी आता थांबायचं नाही, लढायचं असा संदेश पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदारांना दिला आहे. लवकरच त्यांचा राज्य दौरा देखील सुरू होत आहे. यात बीड येथे शरद पवारांची सभा घेऊन संदीप क्षीरसागर अजित पवारांना आव्हान देऊ पाहत आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांनी राज्याचा दौरा करण्यार असल्याचे जाहीर केले.

Beed Ncp Political News
Kirit Somaiya News : सोमय्यांचा पहिला ‘व्हिडिओ’ व्हायरल; ठाकरेंचे तिघेजण जेलमध्ये जाणार ?

येवल्यातील यशस्वी सभेनंतर आता मराठवाड्यातील बीड येथे त्यांची सभा होणार आहे. १७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या या सभेची जबाबदारी अर्थातच संदीप क्षीरसागर यांच्यावर असणार आहे. या निमित्ताने जिल्ह्यात मोठे शक्तीप्रदर्शन करण्याची संधी देखील क्षीरसागर यांना मिळणार आहे. शरद पवारांची सभा आणि त्याद्वारे शक्तीप्रदर्शन करत संदीप क्षीरसागर अजित पवारांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या सभेकडे संपुर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com