लातूर : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारने पारदर्शक कारभार केला, भ्रष्टाचाराच गालबोट कधीही लागलं नाही. त्याआधी राज्यात काँग्रेक आघाडीची सत्ता होती, या काळातही आपल्या सरकारचा कारभार पारदर्शक राहिला. या राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकरा आणून मला लातूरला म्हणजे तुम्हाला पुढे घेऊन जायचंय, असे आश्वासन लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमित देशमुख यांनी प्रचार सभेत दिले.
महाराष्ट्रामध्ये आमदारांची खरेदी विक्री होतेय, पण तुमचा आमदार आहे तिथंच आहे. लोकसभेला मिळालेल्या यशाप्रमाणे आता विधानसभेला देखील एकजुटीने प्रयत्न करून महायुती सरकार खाली खेचू आणि महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणुया, असे आवाहन अमित देशमुख यांनी केले. लातूर ला पुढे घेऊन जायचंय म्हणजे तुम्हाला पुढे घेऊन जायचंय.
तुम्ही म्हणजे लातूर आणि लातूर म्हणजे तुम्ही. जेव्हापासून तुम्ही संधी दिली तेव्हा पासून लातूरकरांसाठी काम केले आहे, यापुढेही काम करत राहणार. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने केलेली लुटालूट आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे जनतेच्या समोर आहे. लातूरला जाणून बुजून विकासापासून दूर ठेवण्याचे महापाप महायुतीने केले.
लातूरसह महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना साथ देण गरेचे आहे. पुर्वी पुढारी कर्तृत्वाने ओळखले जायचे, अलीकडे महायुतीचे पुढारी टक्क्याने ओळखले जातात, याला आपण रोखलं पाहिजे, असे आवाहन अमित देशमुख यांनी केले.
लातूर येथे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या काळात सुरु केले. भाजप महायुतीची सत्ता असताना तुम्ही काय केले ? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जाहीरनामा स्वरूपात जारी केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमाची काँग्रेस आघाडी सरकारच्या वतीने आम्ही कर्नाटकात यशस्वीरित्या अंमलबजावणी करीत आहोत,
काँग्रेस हा दिलेले आश्वासन पाळणारा पक्ष आहे हे यावरून सिद्ध होत आहे, त्यामुळे या पंचसूत्री जाहीरनाम्यावर विश्वास ठेवून, लातूर शहर मतदारसंघातून मला व लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांना विजयी करावे, असेही अमित देशमुख म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.