Latur City Assembly Constituency : अमित देशमुखांचा प्रचारफेऱ्यांचा धडाका, युवकांचा लक्षणीय सहभाग

लातूर शहर मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार आमदार अमित देशमुख यांनी प्रचारफेऱ्यांचा धडाका लावला आहे.
Latur City Assembly election 2024 amit deshmukh political campaign
Latur City Assembly election 2024 amit deshmukh political campaign
Published on
Updated on

लातूर : लातूर शहर मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार आमदार अमित देशमुख यांनी प्रचारफेऱ्यांचा धडाका लावला आहे. या फेऱ्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्त काढण्यात आलेल्या प्रचारफेरीमध्ये युवकांचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे.

लातूर शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील बिलाल मशीद चौकात माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले. इस्लामपुरा, मदनी चौक, सुफिया मशीद, तथागत चौक, हेलन चौकात ही फेरी काढण्यात आली. प्रभाग तीनमधील तुळजाभवानीनगरपासून निघालेली प्रचारफेरी जयभीमनगर, इंदिरानगर, राजीवनगर, विवेकानंद चौकापर्यंत,

प्रभाग क्रमांक सातमधील विवेकानंद चौकापासून जिजामाता शाळा, दसरा पार्क, सिद्धार्थ सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मिरकले कॉर्नर, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम चौक ते मचाले, प्रभाग क्रमांक दोनमधील मचालेपासून ते कृपा सदन चौक, अराफत चौक, अहिल्यादेवी होळकर चौक, संविधान चौकातून प्रचारफेरी एक मिनार चौकात पोचली. तेथे फेरीचा समारोप करण्यात आला.

प्रचारफेरीच्या मार्गावर ठिकठिकाणी आमदार अमित देशमुख यांचे स्वागत करण्यात येत होते. मदनी चौकात अहेमदखान युवा मंच, तथागत चौकात पप्पू गायकवाड मित्रमंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोचल्यानंतर अ‍ॅड. आतिष चिकटे यांच्या वतीने फुलांचा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. जागोजागी महिलांनी त्यांचे औक्षण केले. हातात फलक, झेंडे घेऊन मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.

या प्रचारफेरीत शिवसेना ठाकरे गटाचे सुनील बसपुरे, शेतकरी कामगार पक्षाचे अ‍ॅड. उदय गवारे, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर दीपक सूळ, माजी नगरसेवक माजी नगरसेवक सचिन बंडापल्ले, इम्रान सय्यद, युनूस मोमीन, अशोक गोविंदपूरकर, प्रा. प्रवीण कांबळे व नामदेव इगे आदी सहभागी झाले होते. लातूर शहराचा पूर्व भाग हा लातूरचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com