Abhimanyu Pawar: आमदार अभिमन्यू पवार यांना का आली दिवंगत मेटे, फुंडकरांची आठवण..

Latur District Hospital Abhimanyu Pawar Vinayak Mete Bhausaheb Fundkar: जागा हस्तांतरणाचा निर्णय तत्कालीन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी चे तत्कालीन कार्यकारी परिषद सदस्य विनायक मेटे यांनी घेतला होता.
Abhimanyu Pawar
Abhimanyu PawarSarkarnama

Latur News: लातूर जिल्हा रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची दहा एकर जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या जमीन हस्तांतरणासाठी लागणारा 3.32 कोटी निधी सरकारने मंजूर केला आहे.

याबद्दल भाजप आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले. पण या निमित्ताने त्यांनी आणखी दोन दिवंगत नेत्यांची आठवण काढली. ते म्हणजे विनायक मेटे आणि भाऊसाहेब फुंडकर.

लातूर जिल्हा रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची जमीन हस्तांतरित करण्यात या दोघांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. जागा हस्तांतरणाचा निर्णय तत्कालीन कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी चे तत्कालीन कार्यकारी परिषद सदस्य विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी घेतला होता. यांचे मला आवर्जून स्मरण होत आहे, कारण लातूर जिल्हा रुग्णालयाला कृषी महाविद्यालयाची जागा देण्याच्या निर्णयात त्यांचे निर्णायक योगदान आहे.

Abhimanyu Pawar
Pune Drug Case: एफसी रोड ड्रग्स प्रकरण नेमकं आहे तरी काय?

लातूर जिल्हा रुग्णालयासाठी मी मुख्यमंत्री कार्यालयात काम करत असल्यापासून प्रयत्न करत असल्याने या निर्णयाचा मला विशेष आनंद असल्याचे सांगत पवार यांनी सर्व लातूरकरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

लातूर जिल्हा रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची वापरात नसलेली दहा एकर जागा हस्तांतरित करावी, अशी विनंती अभिमन्यू पवार यांनी केली होती. त्याला 4 फेब्रुवारी 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मंजूरी दिली होती.

जागा हस्तांतरणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने लातूर कृषी महाविद्यालय आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीला देय असलेल्या निधीची तरतूद करण्यात न आल्यामुळे हा विषय रखडला होता.

या विषयासंदर्भात ऑक्टोबर 2023 मध्ये माझे उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर 24 जून, 2024 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जागा हस्तांतणासाठी लागणारे 3.32 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.

लातूरकरांनी केलेले उपोषण आणि माझ्या पाठपुराव्याला यश आले आहे. लातूर जिल्हा रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची दहा एक्कर जागा हस्तांतरित करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. आता जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करवून घेऊन लातूर जिल्हा रुग्णालयाचे काम लवकर सुरू करण्याचा प्रयत्न राहील, असे अभिमन्यू पवार यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com