Latur : मंत्रीमंडळ विस्तारात फडणवीसांचे लाडके, निलंगेकर, पवार वेटिंगवरच..

आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार आणि त्यात तरी या दोघांपैकी कुणाचा नंबर लागणार का? याकडे त्यांचे समर्थक डोळे लावून बसले आहेत. (Mla Sambhaji Patil-Abhimanyu Pawar)
Mla Sambhaji Patil Nilangekar-Fadanvis-Abhimanyu Pawar News, Latur
Mla Sambhaji Patil Nilangekar-Fadanvis-Abhimanyu Pawar News, LaturSarkarnama
Published on
Updated on

लातूर : तब्बल चाळीस दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर मंगळवारी शिंदे-फडणवीस सरकारमधील प्रत्येकी ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांमध्ये (Latur) भारतीय जनता पार्टीकडून आमदारकीची हॅट्रीक साधणारे व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री (Sambahji Patil Nilangekar) संभाजी पाटील निलंगेकर आणि शेतरस्त्याचा औसा पॅटर्नसाठी प्रसिध्द असलेल्या अभिमन्यू पवारांना अपेक्षा असतांना संधी मिळाली नाही.

महाविकास आघाडी सरकारमध्ये लातूर जिल्ह्याला कॅबिनेटसह पालकमंत्रीपद मिळाले होते. निलंग्याचे संभाजी पाटील आणि औशाचे (Abhimanyu Pawar) अभिमन्यू पवार हे दोघेही उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके म्हणून ओळखले जातात. त्यामुळे नव्या सरकारमध्ये आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा हे दोघेही बाळगून होते. पण पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात या दोघांनाही वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

आता दुसऱ्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार आणि त्यात तरी या दोघांपैकी कुणाचा नंबर लागणार का? याकडे त्यांचे समर्थक डोळे लावून बसले आहेत. आज झालेल्या मंत्र्यांच्या शपथविधीत निलंगा आणि औशाचा समावेश नसल्याने हे दोन्ही मतदारसंघ मंत्रीपदापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे निलंगा आणि औसा मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

निलंगा मतदारसंघ हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. येथूनच कै. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी निवडून येत मुख्यमंत्रीपद भुषविले होते. जिल्ह्यात त्यावेळी शिवराज पाटील चाकुरकर, कै. विलासराव देशमुख व कै. शिवाजीराव पाटील निलंगेकर हे कॉंग्रेस पक्षाचे नुसत्या लातुर जिल्ह्यातलेच नव्हे तर मराठवाडा आणि महाराष्ट्राचे मुख्य आधारस्तंभ म्हणून ओळखले जायचे.

Mla Sambhaji Patil Nilangekar-Fadanvis-Abhimanyu Pawar News, Latur
दिलेला शब्द पाळा म्हणत सत्तारांनी नंदनवन बंगला सोडला, अन् मंत्रीपद फिक्स झाले..

मात्र कॉंग्रेसच्या या भक्कम तटबंदीला उध्वस्त करुन तीनवेळा भाजपकडून निवडून येण्याचा विक्रम संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला. २०१४ च्या युती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना याचे बक्षिस म्हणून त्यांना आपल्या मंत्रीमंडळात कॅबिनेट देत कामगार मंत्री केले होते. त्यानंतर निलंगेकरांनी लातूर जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला झिरोतून हिरो करण्याची किमया करून दाखवली होती. त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये देखील त्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा होती.

याच स्पर्धेत आणखी एक नाव चर्चेत होते ते म्हणजे फडणवीस यांचे विश्वासू आणि लाडके आमदार अभिमन्यू पवार यांचे. औशासारख्या नवख्या व माजी आमदार बसवराज पाटलांनी सुजलाम सुफलाम केलेल्या मतदारसंघात पवार यांनी पंचवीस हजारांचे मताधिक्य मिळवत विजय मिळवला होता. प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर पवारांनी मतदारसंघात अनेक विकासकामे केली.

शेतरस्ते या विषयाला हात घालत विरोधी पक्षाचे सरकार असतांनाही शेत तेथे रस्ता हा महत्वाचा पण दुर्लक्षित विषय त्यांनी यशस्वीपणे हाताळला. मतदारसंघात शेकडो किलोमिटर लांबीचे शेतरस्ते तयार करुन शेतरस्त्याचा औसा पॅटर्न संबंध राज्यात नावारुपाला आणला. त्याच बरोबर फळबाग लागवडी, मनरेगातून ग्रामसमृद्धी सारख्या योजनांना प्रभावीपणे राबविल्या.

फडणवीसांनी स्वतः त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुकही केले होते. नव्या सरकारमध्ये मतदारसंघातील काम राज्यात नेण्याच्या दृष्टीने अभिमन्यू पवारांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र या दोघांनाही सध्या वेट अॅन्ड वाॅचच्या भूमिकेतूनच वाटचाल करावी लागेल असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com