Amit Deshmukh : निवडणुकीच्या वातावरणात अमित देशमुखांच्या कारखान्यावर तुफान राडा : गेट तोडून आंदोलक शेतकऱ्यांची आत एन्ट्री

Amit Deshmukh Sugar Factory Farmers Storm : इकडे निवडणूकीचे टेन्शन, तिकडे अमित देशमुखांच्या कारखान्यावर गेट तोडून आंदोलक शेतकऱ्यांचा राडा!
Sonpeth Sugar Factory Amit Deshmukh
Sonpeth Sugar Factory Amit Deshmukhsarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. लातूर जिल्ह्यातील ट्वेन्टीवन शुगर कारखान्यावर उस उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन केले.

  2. स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी ही घटना घडल्याने काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्या अडचणीत भर पडली आहे.

  3. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांमुळे कारखाना परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

Latur News : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीची मोठी जबाबदारी खांद्यावर असलेले काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख यांचे टेंशन वाढवणारी घटना समोर आली आहे. लातूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षातून वर्षानुवर्षे सोबत असलेले सहकारी सोडून जात असून निलंगा नगरपालिकेत अकरा जणांनी पक्षाच्याच उमेदवारांविरोधात बंडखोरी केली आहे. अशा सगळ्या तणावात असताना आज सोनपेठ तालुक्यातील व्टेंन्टीवन शुगर कारखान्यावर संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी धडक दिलीय. या वर्षीची पहिली उचल जाहीर करावी, तसेच गेल्या वर्षी गाळप केलेल्या उसाला प्रतिटन सत्तावीसशे रुपये भाव द्यावा, या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले होते.

अनेक तास कारखान्याच्या गेटवर ताटकळत बसलेल्या आंदोलकांची प्रशासन दखल घेत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे गेट तोडून थेट आत प्रवेश केला. एवढे करून प्रशासनाने पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर कारखान्यासमोर बेमुदत आंदोलन तसेच आमदार अमित देशमुख यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

सोनपेठ तालुक्यातील व्टेंन्टीवन शुगर या कारखान्यावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते. कारखाना प्रशासन जुमानत नसल्याचे पाहुन आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे गेट तोंडुन आत प्रवेश केल्यानंतर आंदोलन चिघळले.

Sonpeth Sugar Factory Amit Deshmukh
Amit Deshmukh News : निलंग्याच्या आमदारांना माझ्या आठवणीने उचक्या लागतात; म्हणून यावचं लागतं! अमित देशमुखांचा संभाजी पाटलांना टोला

सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील व्टेंन्टीवन शुगर या कारखान्याने या वर्षीची पहिली उचल तीन हजार रुपये जाहिर करावी. तसेच गेल्या वर्षी गाळप केलेल्या उसास जाहीर केल्याप्रमाणे सत्तावीशे रुपये प्रति टन भाव द्यावा, कारखान्यामुळे होत असलेल्या प्रदुषणावर नियंत्रण ठेवावे या व इतर मागण्यांसाठी परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आज पासून कारखान्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. सकाळपासून कारखान्याबाहेर उन्हात बसलेल्या शेतकऱ्यांना कारखाना प्रशासनाकडुन सहा तासांपेक्षा अधिक काळ होईपर्यंत कोणताही प्रतीसाद मिळाला नाही.

त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याचे गेट तोंडुन आत प्रवेश केला व कारखान्याचे सर्वेसर्वा अमित देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर कारखाना प्रशासनाकडून आंदोलकांच्या शिष्टमंडळांशी चर्चा करण्यात आली.

पण प्रशासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे पैसै देण्यास असमर्थता दर्शविल्याने चर्चा फिसकटली. त्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना गेटवर बेमुदत धरणे सुरुच ठेऊन अमित देशमुख यांच्या लातुर येथील घरासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला.

या आंदोलनात किसान सभेचे डॉ अजित नवले, राज्य अध्यक्ष उमेश देशमुख ॲड माधुरी क्षिरसागर, किशोर ढगे, ॲड अजय बुरांडे, लक्ष्मण पौळ बालाजी कडभाने विश्वंभर गोरवे, हेमचंद्र शिंदे, शिवाजी कदम श्रीराम बडे, ओंकार पवार, वसंत राठोड, दिपक लिपीचे, दत्ता गव्हाणे, सुदाम शिंदे, सुधीर बिंदू, गणेश पाटील, रामेश्वर मोकाशे, सुरेश इखे, ॠषीकेश जोगदंड, भगवान जोगदंड यांच्या सह परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Sonpeth Sugar Factory Amit Deshmukh
Amit Deshmukh News : नाराजी नाट्यानंतर अमित देशमुख निलंग्यात; नाईकवाडेंचा राग गेला, अशोक पाटील निलंगेकरांचा रुसवा कायम!

FAQs :

1. शेतकऱ्यांनी आंदोलन का केले?
उसाला योग्य दर व बाकीच्या मागण्या पूर्ण न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले.

2. आंदोलन कुठे झाले?
लातूर जिल्ह्यातील ट्वेन्टीवन शुगर कारखान्यावर.

3. या घटनेचा राजकीय परिणाम काय?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अमित देशमुख यांच्यावर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

4. शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
उसाला योग्य दर, थकबाकीची भरपाई आणि तातडीने निर्णय घेण्याची मागणी.

5. कारखाना प्रशासनाची प्रतिक्रिया काय?
प्रशासनाने चर्चा करण्याचा प्रयत्न केला असला तरी शेतकऱ्यांचा संताप कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com