Latur : आता वाढप्या आपला, आमच्यापेक्षा भाजपचा पालकमंत्री झाला याचा आनंद..

निलंगेकर घराण्याचे वलय मोठे असून मी सामान्य कार्यकर्ता आहे. तुम्ही ज्या सुचना कराल ते मी मान्य करतो. ( Mla Abhimanyu Pawar)
Mla Sambhaji Patil Nilangekar-Fadanvis-Abhimanyu Pawar News, Latur
Mla Sambhaji Patil Nilangekar-Fadanvis-Abhimanyu Pawar News, LaturSarkarnama
Published on
Updated on

निलंगा : पूर्वी जिल्ह्याचे राजकीय केंद्र हे लातूर होते. आता ते निलंगा झाले आहे. महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन पालकमंत्र्यांनी निधी वाटपात औसा व निलंगा मतदार संघावर अन्याय केला होता, असा आरोप माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्यावर केला. लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री संभाजी पाटील अथवा अभिमन्यू पवार होईल यापेक्षा भाजपचा पालकमंत्री झाल्याचा आनंद मला असल्याचेही ते म्हणाले.

आता वाडप्या आपला असल्यामुळे विकास निधी कमी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. चिचोंली भंगार येथे बुधवारी (ता.१२) अद्य कवि महर्षी वाल्मिकी मुर्ती स्थापना कार्यक्रमात बोलत ते होते. यावेळी व्यासपीठावर औसाचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) उपस्थित होते. आमदार अभिमन्यू पवार व संभाजी पाटील निलंगेकर हे बऱ्याच दिवसांनी एकाच व्यासपीठावर दिसले.

यावेळी संभाजी पाटील म्हणाले की, सध्या राज्यात शिंदे-फडणविस हे भाजपा युतीचे सरकार असून ते प्रत्येक समाजातील घटकाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून 'कोळी महादेव' समाजाला जातीचे दाखले मिळतात, मात्र त्यात जात पडताळणीसाठी अडचणी येतात त्या दूर करून सुलभ पध्दतीने जात पडताळणीसाठी लातूर जिल्ह्यात विशेष शिबीराचे आयोजन करणार आहोत.

येणाऱ्या काळात कोळी समाजाच्या वैधतेची जबाबदारी माझी असून या समाजावर गेल्या अनेक वर्षापासून जात पडताळीसाठी अन्याय होत आहे. यासाठी आपण लवकरच आदिवासी मंत्र्याची भेट घेऊन चर्चा करणार आहोत. लातूर जिल्ह्यातील कोळी समाजाच्या जात पडताळणीसाठी विशेष शिबीर घेऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे मी व आमदार अभिमन्यू पवार प्रयत्न करणार आहोत. जातीच्या प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यात कोणत्याही अधिकाऱ्यांनी अडवणूक केल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा देखील निलंगेकरांनी दिला.

Mla Sambhaji Patil Nilangekar-Fadanvis-Abhimanyu Pawar News, Latur
दादा भुसे आपलेच पालकमंत्री आहेत...त्यांच्याकडे हक्काने जा..!

अभिमन्यू पवार म्हणाले की, निलंगेकर घराण्याचे वलय मोठे असून मी सामान्य कार्यकर्ता आहे. तुम्ही ज्या सुचना कराल ते मी मान्य करतो. चिंचोली भंगार हे आमदार निलंगेकर यांचे गाव असल्यामुळे या गावासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही. कोळी समाजाच्या मागण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कायमचा हा प्रश्न सोडवण्यासाठी कोळी समाजाचे वकीलपत्र मी आणि आमदार निलंगेकर घेत आहोत. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी फळबाग लागवडीकडे वळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com