Latur : उजणीच्या पाण्याचे राजकारण करून मंत्रीपदं मिळवली, पण पाणी मिळालेच नाही..

लातूरचे राजकारण उजनीच्या पाण्यापासून सुरू होवून त्यावरच थांबते. पण पाण्याचे गाजर अजूनही लातूरकरांना गोड लागले नाही. (Mla Abhimanyu Pawar)
Mla Amit Deshmukh-Abhimanyu Pawar News, Latur
Mla Amit Deshmukh-Abhimanyu Pawar News, LaturSarkarnama
Published on
Updated on

लातूर : लातूर जिल्हा तसा दुष्काळाचा पट्टा आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर औसा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा प्रकल्पातील पाण्याचे वाटप योग्य पदधतीने झाले नसल्याने तालुक्याचा विकास झाला नाही. (Latur) याला लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत आहे, आता यासाठी मराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदार एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवू, असे आश्वास औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी दिले.

गेल्या चाळीस वर्षातील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीची उदासीनता दुष्काळाला कारणीभूत आहे. अनेकांनी उजणीच्या पाण्यावर राजकारण करत मंत्रीपद, आमदारकी मिळवली, पण लातूरकरांना पाणी काही मिळाले नाही, असा टोला देखील पवार यांनी (Amit Deshmukh) अमित देशमुख यांना लगावला.

लातूर विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार अभिमन्यू पवार बोलत होते. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना तेरणा प्रकल्पातील पाण्याचे वाटप योग्य पदधतीने व्हावे, औसा, निलंगा लोहरा आणि उमरगा तालुक्यातील गावांना पाणी उपलब्ध करून द्यावे यासाठी मागणी केली आहे. तेरणा प्रकल्पाची क्षमता ही चार टीएमसी आहे परंतु त्यात किमान दोन टीएमसी गाळ साचला आहे तो काढून प्रकल्पाची क्षमता वाढवण्याची गरज आहे.

कर्नाटकात वाहून जाणारे पाणी तेरणा प्रकल्पात वळवल्यास त्याचा फायदा चार तालुक्याला होणार आहे. आजतागायत मराठवाड्यातील आमदारांची उदासीनता होती, आता सर्व पक्षीय आमदार एकत्र येणार असून शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ कसा देता येईल यावर नक्कीच काम करू असा, विश्वास अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला.

या शिवाय उजणीच्या पाण्याचा उल्लेख करत पवार यांनी जिल्ह्यातील राजकारण्यांवर टीकास्त्र सोडले. लातूरचे राजकारण उजनीच्या पाण्यापासून सुरू होवून त्यावरच थांबते. पण पाण्याचे गाजर अजूनही लातूरकरांना गोड लागले नाही, असा टोला पवार यांनी लगावला. आमदार अमित देशमुख यांना उजनीच्या पाणी प्रश्नावर आमदारकी, मंत्रीपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले, पण उजनीचा पाणी प्रश्न कायम आहे.

Mla Amit Deshmukh-Abhimanyu Pawar News, Latur
शिंदे गटातील आमदार म्हणतात, 'आमचं चुकलं' : चंद्रकांत खैरेंचा दावा

आता नवीन सरकार वॉटर ग्रिडच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडविणार असल्याचे पवार यांनी सांगितले. लातूरचा पाणी प्रश्न कायम विधान सभेच्या निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला. पण उजनीचे पाणी अजूनही लातूरकरांना मिळाले नाही. नवीन सरकार उजनीचा पाणी प्रश्न सोडविणार का? असा सवाल लातूरकर करत आहेत.

राज्य सरकार वॉटर ग्रीडच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्यातील पाणी गोदावरी खोऱ्यात आणून लातुरसह मराठवाड्याचा पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगीकरण यासाठी पाण्याची उपलब्धता करण्यास सकारात्मक आहे. नक्कीच मराठवाड्यातील पाणी प्रश्न कायम स्वरुपी सोडवला जाईल, अशी माहिती देखील पवार यांनी यावेळी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com