Amit Deshmukh News: मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीतून डॉ. शिवाजी काळगेच रेल्वे बोगी बाहेर काढणार...!

latur lok sabha election 2024: आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख असे सगळे देशमुख कुटुंबाने जोरात प्रचाराला सुरवात केली आहे.
Amit Deshmukh
Amit Deshmukh Sarkarnama

Latur News: लातूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा सामना महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्याशी होत आहे. लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीवरून राजकारण रंगलं आहे. काँग्रेसचे नेते, आमदार अमित देशमुख यांनी महायुतीच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

लातूरमध्ये भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते येत आहेत, लातूरचा पाण्याचा प्रश्न, लातूर-पुणे रखडलेला रस्ता करु, केंद्रीय विद्यापीठ मंजुर करू, अशी खोटी आश्वासने प्रत्येक वेळी देऊन महायुती जनतेची दिशाभूल करीत आहे. लातूर येथे मराठवाडा रेल कोच फॅक्टरी तयार केली, मात्र खोटी आश्वासने देऊन भाजपाने दोन निवडणूका जिंकल्या. पहिल्यांदा मेट्रो रेल्वेच्या बोगी करु म्हणून दिशाभूल केली, तर,दुसऱ्यांदा बुलेट ट्रेन करु, आणि आता तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी म्हणत आहेत, वंदे भारतच्या बोगी करु, ही फसवाफसवी आणि दिशाभूल सुरू आहे, त्यामुळे आता या मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगेच रेल्वे बोगी बाहेर काढणार असल्याचा दावा अमित देशमुख यांनी लातूर येथील प्रचार सभेतल्या भाषणात केला आहे.

Amit Deshmukh
Ajit Pawar News : "2014 मध्ये जानकर बारामतीत कमळावर लढले असते, तर सुपडा साफ झाला असता," अजितदादांचं विधान

लातूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. खरी लढत महाविकास आघाडीचे डॉक्टर शिवाजी काळगे आणि महायुतीचे सुधाकर शृंगारे यांच्यात आहे. काळगेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने अतिशय गतीने व आक्रमकपणे प्रचाराला सुरुवात केली. आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख असे सगळे देशमुख कुटुंबाने जोरात प्रचाराला सुरवात केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंग उदगीरकर हे नवखे आहेत दखल घ्यावी, असे ते एकमेव उमेदवार स्पर्धेत आहेत. भाजपने २०१९च्या निवडणुकीत पावणेतीन लाखापेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आलेले खासदार सुधाकर शृंगारे यांना रिंगणात उतरवले आहे. शिवराज पाटील चाकुरकर यांच्या स्नुषा अर्चना पाटील यांना भाजपने प्रवेश दिला. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय गणिते बदलली आहेत.

असा आहे लातूर लोकसभा मतदारसंघ

  • माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर हे या मतदारसंघातून सलग सात वेळा निवडून आले होते.

  • रूपाताई पाटील निलंगेकर यांच्याकडून आठव्यांदा शिवराज पाटील चाकूरकर दारुण पराभव झाला.

  • २००९ मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाला .

  • माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कोल्हापूरचे जयवंतराव आवळे यांना उमेदवारी देत निवडून आणले.

  • २०१४ व २०१९ अशा सलग दोन निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला.

  • काँग्रेलचा गड आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आता आमदार अमित देशमुख कामाला लागले आहेत.

  • आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे नेते लातुरचा गड जिंकण्यासाठी पायाला भिंगरी लावून प्रचार करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com