Latur : नानाभाऊ राज्याचं सोडा, लातूरात स्वबळावर लढून दाखवा..

पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांनी नव्या घरी तरी सुखाने नांदावे त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत. (Mla Sambhaji patil Nilangekar)
Mla Sambhaji Patil Nilangekar-Nana Patole
Mla Sambhaji Patil Nilangekar-Nana PatoleSarkarnama

निलंगा : काँग्रेसकडून सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याच्या वल्गना केल्या जात आहेत. राज्यात काँग्रेसकडून काय निर्णय होईल तो त्यांचा प्रश्न आहे. (Latur) मात्र राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ((Nana Patole) व पालकमंत्री अमित देशमुख यांनी किमान लातूर जिल्ह्यात तरी स्वबळावर निवडणुक लढवून दाखवावी असे, आव्हान माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी दिले.

निलंगा तालुक्यातील कांही भाजपा कार्यकर्त्यांचा शुक्रवारी मुंबई येथे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला. त्याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लातूरसह मराठवाडा भाजपा मुक्त करण्याचा पॅटर्न निर्माण करण्याचे सुतोवाच केले होते. एवढेच नाहीतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे जाहीर केले. पटोले यांच्या भाजप मुक्त पॅटर्न आणि स्वबळाच्या विधानावर आमदार संभाजी पाटील निलंगकेर यांनी पलटवार केला.

निलंगेकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षे राजकारणात काम करत असताना व्यक्ती म्हणून सोडून गेल्यानंतर वेदना तर होत असतातच. मात्र राजकारणात महत्त्वकांक्षा निर्माण झाली की, काही कार्यकर्ते पक्षांतर करत असतात, त्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण काँग्रेसने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका राज्याचे सोडा किमान लातूर जिल्ह्यात तरी स्वतंत्र लढवाव्यात, असे माझे त्यांना आव्हान आहे.

पक्षांतर केलेल्या कार्यकर्त्यांनी नव्या घरी तरी सुखाने नांदावे त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल माझ्या शुभेच्छा आहेत. नव्या घरची सासू कडक असून नवऱ्याची भेट होणे मुश्कील होणे अवघड असल्याने संसार कसा थाटणार हे लवकरच जनतेला दिसणार असल्याची मिश्कील टिप्पणी त्यांनी यावेळी केली.

Mla Sambhaji Patil Nilangekar-Nana Patole
राणे अन् मलिकांना वेगळा न्याय का ? शरद पवारांचा भाजपला सवाल

महाविकास आघाडीच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील ओबीसी समाज राजकीय आरक्षणापासून वंचित राहीला असून यास सर्वस्वी ठाकरे सरकार जबाबदार आहे. मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी एक चकार शब्दही काढला नाहीत. यावरूनच असे दिसते की, या महाविकास आघाडी सरकारची ओबीसी व मराठा समाजाला आरक्षण द्यायची नियत नाही, असेही निलंगेकर म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com