राणे अन् मलिकांना वेगळा न्याय का ? शरद पवारांचा भाजपला सवाल

नारायण राणे यांना अटक झाली तेव्हा भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही, असा सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama

पुणे : ''राष्ट्रवादीचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांच्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. त्यांना राजकीय हेतुनं अटक केली, '' असे राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी आज सांगितले. पवार हे पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

''एखाद्या मुस्लिम कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांला अटक केली तर त्याचा संबध दाऊदशी जोडणे हे चुकीचे आहे. मलिक हे मुस्लीम आहेत म्हणून त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जातो. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण सिंधुदुर्गचे माझी सहकारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली तेव्हा भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही, असा सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला.

''नारायण राणे (Narayan Rane)यांच्यासाठी एक कायदा लावता अन् मलिकांना (Nawab Malik)दुसरा कायदा लावतात. मलिकांसाठी वेगळा न्याय का ? भाजपने राणेंना मंत्रीमंडळातून का कमी केलं नाही,'' असे पवार म्हणाले. रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar
Empirical Data संकलीत करुन सांगलीतील 'या' गावाने करुन दाखवलं!

शरद पवार म्हणाले, ''रशिया, युक्रेनमधील अनेक विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना तेथून कसे बाहेर काढता येईल, याकडे केंद्र सरकारने अधिक लक्ष दिले पाहिजे. याबाबत माझे परराष्ट्र मंत्र्यांशी बोलणं झालं आहे. यात कुणीही राजकारण आणू नये. सगळ्यांनी एकत्र येऊन युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मुलांना कसे आणता येईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,''

नदी सुधार प्रकल्प..पुणेकरांना झळ बसू शकते..

पु्ण्यात नदी सुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे, याबाबत पवार म्हणाले, ''मी या संदर्भात एक बैठक घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यामध्ये पर्यावरण तज्ज्ञ, जलसंपदा विभागाचे अधिकारी असतील. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. त्या मी वाचल्या आहेत. त्या सूचनाचे पालन व्हायला हवं अन्यथा भविष्यात त्याची झळ ही पुणेकरांना बसू शकते,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com