Latur News : विधानसभेचे दावेदार बाजार समितीलाच हरले..

Nilanga : अशोकराव पाटील निलंगेकर,अभय सोळूंके,अजित माने, सुनील माने यांची नावे विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत.
Nilanga Market Committee News
Nilanga Market Committee NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : निलंगा विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अन् आमदारकीचे स्वप्न पडू लागलेले संभाव्य उमेदवार चक्क बाजार समितीच्या (Nilanga Market Committee) निवडणूकीतच हरले. त्यामुळे आता पक्षाकडे कोणत्या तोंडाने विधानसभेवर दावेदारी सांगावी असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. पदाधिकारी, प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी द्यायची सोडून आमदार होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना बाजार समितीचाही मोह सुटला नसल्याचे या निवडणुकीतून समोर आले आहे.

Nilanga Market Committee News
Sharad Pawar Big Statement: 'मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार; शरद पवारांची मोठी घोषणा

निलंगा व औरादशहाजानी बाजार समितीत भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी स्वतःच्या नावे नवनिर्माण विकास पॅनल उभे केले होते. (SambhajiPatil Nilangekar) निलंगा येथे १८ तर औराद येथेही १८ जागी मोठ्या मताधिक्याने त्यांचे उमेदवार निवडून आल्याने विरोधक घायाळ झाले. (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीचे दिगग्ज नेते अशोक पाटील निलंगेकर, अभय साळुंके, शिवसेनेचे लिंबन महाराज रेशमे, शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पंडित धुमाळ यांच्यासारखे नेते महाविकास आघाडीत असून सुद्धा निलंगा व औराद बाजार समितीत पराभूत झाले.

महाविकास आघाडीला इथे खातेही उघडता आले नाही. (Latur) शिवाय निलंगा बाजार समितीमध्ये भाजपाचे दोन पॅनल होते. एक संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली तर दुसरे त्यांचे बंधु अरविंद पाटील निलंगेकर यांचे. औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गिय गोपीनाथ मुंडे शेतकरी विकास पॅनल तर महाविकास आघाडीकडून डाॅ. शिवाजीराव पाटील निलंगेकर शेतकरी विकास पॅनल मैदानात होते.

महाविकास आघाडी व अभिमन्यू पवार यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मात्र अरविंद पाटील निलंगेकर यांच्या परफेक्ट नियोजनापुढे आघाडी व पवार पॅनल तग धरू शकले नाही. मोठ्या मतांच्या फरकाने काँग्रेस व अभिमन्यू पवार गटाला पराभव पत्करावा लागला. गेल्या कांही दिवसापासून काँग्रेसकडून अशोकराव पाटील निलंगेकर,अभय सोळूंके,अजित माने, सुनील माने यांची नावे विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. मात्र त्यांना बाजार समिती निवडणुकीतच पराभवाचे तोंड पहावे लागले.

यात महाविकास आघाडीचे प्रमुख निलंगा बाजार समिती अशोकराव पाटील निलंगेकर (प्रदेश सरचिटणीस काँग्रेस), विजयकुमार पाटील (तालुका अध्यक्ष काँग्रेस), अभय साळुंके (प्रदेश सचिव काँग्रेस) यांचे लहान बंधू श्रीकांत साळुंके, अविनाश रेशमे (तालुकाप्रमुख शिवसेना ठाकरे गट), सुधाकर पाटील (काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष), तर औराद बाजार समितीत पराभूत झालेले अजित माने,(माजी पंचायत समिती सभापती),हाजी सराफ (माजी सभापती बाजार समिती औराद) यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com