Marathwada : माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांचे चुलत बंधू चंद्रशेखर पाटील यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी आपल्या काही मित्रांना गुडबाय असा मेसेज केला होता. या घटनेमुळे लातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रशेखर पाटील यांनी शेजारीच राहणाऱ्या शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरातील हाॅलमध्ये स्वतःवर गोळी झाडून घेतली. (Latur) या संपुर्ण प्रकरणाची पोलिस चौकशी करत आहेत. या संदर्भात मिळालेल्या माहितीनूसार चंद्रशेखर पाटील चाकूरकर वय (८१) हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते. (Marathwada) दररोज ते सकाळी फिरायला जाणे आणि परत आल्यानंतर थेट घरी न जाता भावाच्या म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी जावून चहा पिणे, पेपर वाचने असा त्यांचा नित्यक्रम होता.
शिवराज पाटील चाकूरकर यांच्या कुटुंबातील बहुतांश सदस्य हे लातूर येथील निवासस्थानी फार कमी वेळा येतात. आज शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे सकाळी घरातच होते. रोजच्या प्रमाणे चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे घरात आल्यावर त्यांना चहा घ्या, मी आवरून येतो असे सांगून ते निघून गेले. पण थोड्याच वेळात गोळीचा आवाज झाला आणि घरातील नोकर आणि शैलेश पाटील हे धावत हॉलमध्ये आले. तेव्हा त्यांना चंद्रशेखर पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.
घटनेची माहिती तात्काळ लातूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे वडिलोपार्जित शेती पाहात होते. त्यांना दोन मुले, दोन मुली असून ते एका मुलासोबत चाकूरकर यांच्या घराच्या बाजूला असलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते. सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते.
चंद्रशेखर पाटील चाकूरकर याचे चिरंजीव ॲड लिंगराज पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांची बायपास सर्जरी झालेली होती. त्यानंतरही अनेक आजारामुळे ते त्रस्त्र होते. कदाचित आजापरणाला कंटाळूच त्यांनी हे टोकाचे पाऊ उचलले असावे, अशी शंका त्यांनी उपस्थितीत केली. आज सकाळी ते दररोज प्रमाणे घरातून बाहेर पडले. त्यानतंर त्यांनी परिचित असलेल्या अनेकांना गुडबायचा मेसेज केला. काहीवेळाने व्हॉट्सअँप स्टेटस ही ठेवला. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.