Latur Political : वाडा हलत नसतो, त्यातली माणसं हलतात ; निलंगेकरांचा टोला..

Mla Nilangekar : कुणाला पक्षात घ्यायचं, कुणाला नाही हा आमचा अधिकार नाही. वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होतात, ते आम्ही मानतो.
Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit Deshmukh, Latur
Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit Deshmukh, LaturSarkarnama

Marathwada : लातूरचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार अमित देशमुख व त्यांचे आमदार बंधु धीरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा मध्यंतरी जोरात सुरू होत्या. त्यावर अमित देशमुख यांनी भाष्य करत आमचा वाडा मजबुत आहे, तो कधीच हलू शकतं नाही, असे सांगत भाजप प्रवेशाच्या चर्चा निरर्थक असल्याचे स्पष्ट केले होते.

Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit Deshmukh, Latur
Aurangabad Crime News : एसीपी विशाल ढुमे अखेर निलंबित..

यावर देशमुख बंधूंना प्रिन्स संबोधणाऱ्या माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगकेर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी ` हो वाडे हलतं नसतात, त्यातली माणसं हलत असतात` असा टोला लगावला. गेल्या आठवड्यात लातूर येथे झालेल्या (Bjp) भाजपच्या युवा मेळाव्यात निलंगेकरांनी देशमुखांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर भाष्य केले होते.

संभ्रम निर्माण करायचा आणि निवडणुका जिंकायच्या ही काॅंग्रेसची जुनी रणनिती आहे. लातूरचे प्रिन्स आम्हाला नको, ते भाजपमध्ये येत नाहीत आणि आम्ही त्यांना घेत नाही, अशा शब्दात निलंगेकरांनी आपला विरोध दर्शवला होता. त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संभाजी निलंगेकरांनी पुन्हा या विषयावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना अमित देशमुख यांना टोला लगावला.

निलंगेकर म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणात कायम उंबरठ्यावर उभे राहायचे आणि लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा हेच काॅंग्रेसकडून केले गेले. आता त्यांनी संभ्रम निर्माण करून निवडणुका जिंकण्याचे राजकारण बंद केले पाहिजे. भाजप प्रवेशाच्या चर्चा आमच्या कुठल्याच नेत्याने केल्या नाही, काॅंग्रेसच्या समर्थकांनीच सोशल मिडियाच्या माध्यमातून त्या केल्या. यामागे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचाच प्रयत्न होता.

कायम उंबरठ्यावर उभे राहून राजकारण करणारे आमचा वाडा मजबुत आहे, तो हलूच शकत नाही, असा दावा केला आहे. हो आम्हाला मान्य आहे, वाडे हलतं नसतात, ते कायम आहे तिथेच उभे असतातं, पण त्यातली माणसं हलतात. हे या जिल्ह्याने यापुर्वी देखील पाहिले आहे. मला त्या खोलात जायचे नाही, पण विधान परिषदेसाठी दिवंगत विलासराव देशमुख यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होतीच ना.

Mla Sambhaji Patil Nilangekar-Amit Deshmukh, Latur
Aurangabad Scam : तीस-तीस घोटाळा असा झाला..

लातूर ग्रामीणची जागा जिंकण्यासाठी काॅंग्रेसने शिवसेनेसोबत सेटिंग केली होती, यावर मी आजही ठाम आहे. ही जागा काॅंग्रेसने मॅनेज केली होती. त्यामुळे आम्ही काहीही करू शकतो हे एकीकडे दाखवायचे आणि पुन्हा आमचा वाडा मजबुत आहे हे सांगायचे म्हणजे हास्यास्पदच म्हणावे लागेल.

यायचं असेल तर या, पण त्याआधी तुम्हाला आमच्या पक्षाची, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ध्येय धोरणं, विचार मान्य आहेत का? ते आधी स्पष्ट करा. कुणाला पक्षात घ्यायचं, कुणाला नाही हा आमचा अधिकार नाही. वरिष्ठ पातळीवर जे निर्णय होतात, ते आम्ही कार्यकर्ते मानत असतो. उद्या देशमुखांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय झाला, तर त्याचे देखील आम्ही स्वागतच करू, असेही निलंगेकर यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com