Riteish Deshmukh: लाडक्या भावाच्या प्रचारात अभिनेत्याची झापुक झुपूक एन्ट्री: लातुरच्या सभेत 'लयभारी' डायलॉगबाजी

Riteish Deshmukh Campaigns For Dhiraj Deshmukh: “तुमचा पंजा भारी, माझा पंजा भारी, सगळ्यांचाच पंजा लय भारी”, असा लय भारी चित्रपटातील डायलॉग म्हणत रितेशने प्रचार सभेची रंगत वाढवली. यावेळी जोरात बटण दाबा… यावेळी झापुक झुपुक वातावरण झाले आहे....
Riteish Deshmukh
Riteish DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Latur News: काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार रमेश कराड हे मैदानात आहेत.

धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी त्यांचा लाडका भाऊ, अभिनेता रितेश देशमुख यांनीही राजकीय व्यासपीठावर झापुक झुपुक एन्ट्री घेतली आहे. धीरज यांच्या प्रचारसभेत रविवारी रितेश देशमुख 'लयभारी' डायलॉगबाजी करीत सत्ताधाऱ्यांना धुतले. लातुरात रितेश देशमुखांची प्रचार सभा झाली.

"प्रत्येक पक्ष म्हणतो धर्माला वाचवा असे म्हणतो. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे.जे लोक तुम्हाला म्हणतात, धर्म बचाव असे सांगतात, ते आपल्या धर्माला नाही तर पक्षाला प्राधान्य देत आहेत. धर्माचे आम्ही पाहतो, आधी आमच्या कामाचं पाहा, आमच्या शेतमालाला काय भाव देतात, हे पाहा," असे खडेबोल रितेश देशमुख यांनी महायुतीच्या नेत्यांना सुनावले.

'गुलिगत धोका'

"धर्माचे आम्ही बघून घेतो, आमच्या कामाचे आधी सांगा… तुम्ही पिकाचा भाव सांगा… तुम्ही आमच्या आया-बहिणी सुरक्षित आहेत का? ते सांगा, असे अनेक प्रश्न रितेश यांनी उपस्थित केले भाजपचे उमेदवार रमेश कराड यांच्यावर रितेश यांनी आपल्या भाषणात टीकास्त्र डागले. भाजपचे उमेदवार कराड यांचा उल्लेख रितेश यांनी 'गुलिगत धोका'असा केला.

तुमच्यामुळे धीरज भैय्या म्हणावे लागतंय

“तुमचा पंजा भारी, माझा पंजा भारी, सगळ्यांचाच पंजा लय भारी”, असा लय भारी चित्रपटातील डायलॉग म्हणत रितेशने प्रचार सभेची रंगत वाढवली. यावेळी जोरात बटण दाबा… यावेळी झापुक झुपुक वातावरण झाले आहे. समोर गुलिगत धोका आहे, असे ते म्हणाले. "ज्या व्यक्तीला लहानपणापासून मी धीरज म्हणत होतो, तुमच्यामुळे धीरज भैय्या म्हणावे लागत आहे," अशी कोपरखळी त्यांनी मारली.

Riteish Deshmukh
Ajit Pawar: शिवतारेंच्या विरोधातील सभेला अजितदादांनी मारली दांडी, शहांना भेटण्यासाठी मुंबई गाठली! नेमकं काय घडलं ?

बटनावर टेंगुळ द्यायची वेळ...

गेल्या निवडणुकीत मी भाषणात म्हणालो होतो की या गड्याला (धीरज देशमुख) मतदान करा. एक लाख मतांनी तुम्ही मतदान केले होते. गेल्या पाच वर्षांपासून धीरज प्रामाणिकपणे काम करीत आहे. आपल्याला लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसायचे आहेत. आई बहि‍णींचा त्रास कमी करायचा आहे, असे रितेश देशमुख म्हणाले. बुक्कीत नाही बटनावर टेंगुळ द्यायची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी धीरज यांना पाठिंबा देण्यासाठी रितेश हे प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. धीरज देशमुख यांच्यासोबतचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. "धीरज विलासराव देशमुख यांना माझं मत आहे". असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com