Latur Rural Assembly Constituency : प्रत्येक कुटुंबासाठी २५ लाखांचा विमा उतरवणार - धीरज देशमुख

आपल्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाचा विकास व्हावा, त्याला आर्थिक स्थैर्य मिळावे, ही माझी भावना आहे.
Latur Rural Assembly election 2024 25 lakh insurance dhiraj deshmukh politics
Latur Rural Assembly election 2024 25 lakh insurance dhiraj deshmukh politics
Published on
Updated on

लातूर : आपल्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाचा विकास व्हावा, त्याला आर्थिक स्थैर्य मिळावे, ही माझी भावना आहे. त्या अनुषंगाने मतदार संघातील प्रत्येक कुटुंबाचा २५ लाख रुपयांचा विमा आपण उतरवू,असे आश्वासन काँग्रेस महाविकास आघाडीचे लातूर ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार आमदार धीरज देशमुख यांनी दिले.

औसा तालुक्यातील टेंभी, येल्लोरीवाडी, वरवाडा व रिंगणी येथील ग्रामस्थांशी आमदार देशमुख यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. श्रीपतराव काकडे, शाम भोसले, नारायण लोखंडे, सदाशिव कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या हितासाठी विविध योजना राबवल्या. नंतरच्या सरकारने योजनांची नावे बदलण्याचे काम फक्त केले आहे. निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे.

त्यावेळी राज्यातील सर्व महिलांसाठी एसटी बसचा प्रवास मोफत केला जाणार आहे. राज्यात बेरोजगारांची संख्या वाढली असून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळेपर्यंत प्रति महिना ४ हजार रुपये दिले जाणार आहेत. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. तरुण,शेतकरी,शेतमजूर, महिला या प्रत्येक घटकासाठी आघाडी सरकार विविध योजना लागू करणार आहे. त्यामुळे मतदारांनी आपले मतरुपी आशीर्वाद महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे करावेत.

आपल्या गावांचा विकास करून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावे, असे आवाहनही देशमुख यांनी केले. टेंबी येथील मेळाव्यास सतीश शिंदे, उदयसिंह देशमुख, वामन मोरे, अमर भोसले, शिवप्रसाद शिंदे, सुधाकर मिसाळ, हमीद सय्यद, सचिन पाटील, अकबर सय्यद, रसूल सय्यद यांची उपस्थिती होती. येल्लोरीवाडी येथे सरपंच शरद सर्जे, उपसरपंच केशव सर्जे, दशरथ सर्जे, सुधीर सर्जे, नारायण सर्जे, दीपक सर्जे, बाळासाहेब सर्जे, श्रीमंत सर्जे, मारुती चिंचोलकर तर रिंगणी येथे सुरेश पाटील, श्रीहरी रोंगे, धनु महाराज रिंगणीकर, रामराजे रोंगे, विठ्ठल रोंगे, अनिकेत रोंगे, आत्माराम बोचरे, सुभाष गाडेकर, खंडू रोंगे, दत्ता भोसले,अंकुश रोंगे उपस्थित होते.

पाथरवाडीतील युवा कार्यकर्त्यांनी आमदार देशमुख यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या गावातील धर्मराज सुडे, दत्तात्रय मदरे, विजय कांबळे, बाबूराव शिंदे, वैभव गुरमे, अभिषेक जाधव, ओमप्रकाश वलसे, सौदागर कोचकुवाड, सुजय बेंबडे, माजीद शेख, ऋषीकेश चव्हाण, सागर जाधव, अजय कोवळे, विशाल गोडभरले, योगिराज सुडे, ज्ञानेश्वर पौळ, राम पवार, ओमप्रकाश वळसे, वैभव गुरमे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, सोमेन वाघमारे, रोहित विलास गायकवाड, सिदाजी पौळ, आदित्य पाटील आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com