Latur : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खासगीकरण थांबवा, खासदार शृंगारेंची मागणी

खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेऊन खासगीकरण थांबविण्या संबंधी विनंती केली आहे. ( Latur District)
MP Sudhakr Shringare- Central Minister Madivia
MP Sudhakr Shringare- Central Minister MadiviaSarkarnama
Published on
Updated on

लातूर : केंद्र सरकारच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या लातुर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खासगीकरण करण्याच्या हालचाली राज्यसरकारने चालविल्या आहेत.(Latur) मात्र या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे खासगीकरण करू नये हे हॉस्पिटल सरकारी यंत्रणांनीच चालवावे अशी मागणी भाजपचे (Bjp) खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांच्याकडे केली आहे.

लातुरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक हे आरोग्य सुविधेसाठी या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर अवलंबून आहेत. (Marathwada) खासगीकरण झाल्यास सामान्य, गरीब रुग्णांना येथे कमी दरात अथवा तातडीची मदत मिळण्यास अडथळे निर्माण होतील. या शिवाय हॉस्पिटलवर खासगी संस्थेचेच नियंत्रण असणार आहे, त्यामुळे खासगीकरण न करता हे हॉस्पिटल राज्य सरकारच्या आरोग्य विभागानेच चालवावे अशी मागणी लोकांमधून पुढे येते आहे.

ही मागणी लक्षात घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेऊन खासगीकरण थांबविण्या संबंधी विनंती केली आहे. शिक्षणामध्ये लातूर पॅटर्न संपुर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षांमध्ये देखील लातूरने उतुंग भरारी घेतल्याचे अनेकदा पहायला मिळाले आहे.

MP Sudhakr Shringare- Central Minister Madivia
राज ठाकरेंना भाजपच्या एका खासदाराचा विरोध, तर दुसरे खासदार स्वागतासाठी सज्ज

आता जिल्ह्यात चांगल्या दर्ज्याच्या वैद्यकीय सेवा पुरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारने विविध आरोग्य सुविधा निर्माण केल्यानंतर केंद्राने देखील लातूर येथे सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटल सुरू करून सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.

परंतु आता या हाॅस्पीटलचे खाजगीकरण केले जाणार असल्याने इथे गरीबांना उपचार मिळतील की नाही? याबद्दल शंका उपस्थितीत केली जात आहे. सुपर स्पेशालिटी हाॅस्पीटलचे खाजगीकरण करू नये, ही मागणी खासदार श्रृंगारे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com