Udgir Aghori Ritual Case : 20 कोटींच्या ‘पैशाच्या पावसाचा’ डाव; अल्पवयीन मुलीचा कथित वापर? मध्यरात्रीच्या अघोरी विधीवर पोलिसांचा छापा

Police Bust Alleged ₹20 Crore Money-Rain Ritual in Udgir : उदगीरजवळ मध्यरात्री सुरू असलेल्या कथित विधीवर पोलिसांचा छापा; महाराष्ट्रासह तीन राज्यांतील व्यक्तींचा सहभाग असल्याचा प्राथमिक संशय.
Udgir Aghori ritual minor girl case
Udgir black magic ritual caseSarkarnama
Published on
Updated on

Udgir Latest News : तब्बल 20 कोटी रुपयांसाठी पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने अघोरी विधी करण्याची तयारी सुरू असताना उदगीर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कथित विधीसाठी अल्पवयीन मुलीचा वापर केला जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून हा प्रकार उधळून लावला.

या प्रकरणी 15 जणांविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह पॉक्सो कायद्यातील कलम 12 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपींनी संगनमत करून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मीपूजेच्या नावाखाली विशेष विधी आयोजित केला होता. उदगीरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हा विधी मध्यरात्रीनंतर सुमारे दोन वाजता सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या विधीमध्ये अल्पवयीन मुलीचा वापर केला जाणार असल्याची माहिती मिळताच लातूरच्या (Latur) उदगीर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या कारवाईमुळे कथित अघोरी विधी थांबवण्यात आला.

Udgir Aghori ritual minor girl case
Dheerajsinh Rajput Murder Case : धीरजसिंह हत्या प्रकरणात संग्राम जगतापांचा पोलिसांवर गंभीर आरोप; SITवर मंत्री विखे काय म्हणाले?

या प्रकरणात फुंडलिक देवराव रूपनर, सचिन साहेबराव भोंगळे यांच्यासह काही संशयितांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. प्राथमिक तपासात महाराष्ट्रातील पुण्याबरोबरच तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील काही व्यक्तीही या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. काही संशयितांची संपूर्ण नावे आणि पत्ते अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने पोलिस त्यांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.

Udgir Aghori ritual minor girl case
Dheerajsinh Murder Case : कलबुर्मे अन् टिपरसेंकडून हिंदुत्ववादी कार्यकर्ते लक्ष; आमदार जगतापांच्या अहिल्यानगर पोलिसांवरील आरोपांनी खळबळ

20 कोटींचा डाव?

पोलिसांच्या चौकशीत या विधीमागे सुमारे 20 कोटी रुपयांसाठी पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकारात अल्पवयीन मुलीचा वापर करण्यामागे नेमका उद्देश काय होता, तिचा वापर केवळ अंधश्रद्धेच्या विधीसाठी केला जाणार होता की त्यामागे अन्य काही हेतू होता, याचा पोलिस कसून तपास करत आहेत. पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.

मुख्य सूत्रधार कोण?

अंधश्रद्धा आणि पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा वापर केल्याच्या संशयावरून 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, आर्थिक व्यवहार झाले होते का आणि या कथित विधीचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध उदगीर ग्रामीण पोलिस घेत आहेत. या प्रकरणामुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अघोरी प्रथांमध्ये अल्पवयीनांचा वापर होत असल्याचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com