दुष्काळी लातूरकरांनी पहिल्यांदाच अंगावर झेलल्या रौद्रधारा!

वारंवार कोरडा दुष्काळ ,(Latur DryDrought)अनुभवणाऱ्या लातुरात 'ओला दुष्काळ' सदृश्य स्थिती येईल, असे आजवर कोणाच्या स्वप्नातही आले नाही. मात्र, यंदा प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे.
Latur Flood
Latur FloodSarkarnama

लातूर : लातूरात दर तीन-चार वर्षांत एकदा तरी पाण्याची टंचाई (Water scarcity)असते. त्यामुळे 'लातूर म्हणजे कोरडा दुष्काळ',(Latur DryDrought)ही ओळख राज्यभर पसरली आहे. अशा भागातील मांजरा धरणासोबत लातूरकरांनीही पहिल्यांदाच आपल्या अंगावर रौद्रधारा झेलल्या आहेत. निसर्ग कोपतो, आभाळ फाटते म्हणजे काय असते?, हा कटू अनुभवही लातूरकरांना प्रथमच यंदा अनुभवायला मिळत आहे.

लातूरसाठी 'पाणी' हा अतिशय संवेदनशील विषय आहे. येथे वारंवार पाण्याची टंचाई तर, कधी कोरडा दुष्काळ (DryDrought)असतो. त्यामुळे काही वर्षांपूर्वी लातूरला रेल्वेने पाणी आणून नागरिकांची तहान भागवण्याची वेळ आली होती. (Water was brought to Latur by train)आठवड्यातून एकदा नळाला येणारे पाणी, हेही इथे सवयीचे झाले आहे. इथल्या निवडणुकांमध्ये सुद्धा 'पाणी' हा विषय मध्यवर्ती असतो. उजणीचे पाणी आणू, वॉटर ग्रीड प्रकल्प करू, दुष्काळमुक्त लातूर करणार अशा (सर्वपक्षीय) घोषणा येथे अनेकदा झाल्या. त्यासाठी इथले नेते प्रामाणिकपणे प्रयत्नही करताना दिसत आहेत

Latur Flood
कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले, `काही भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला`  :

अशा वारंवार कोरडा दुष्काळ अनुभवणाऱ्या लातुरात 'ओला दुष्काळ' सदृश्य स्थिती येईल, असे आजवर कोणाच्या स्वप्नातही आले नाही. पर्जन्यछायेचा प्रदेश असल्याने लातुरात पुरेसा पाऊस पडत नाही. त्यामुळे यंदा पूर येणे शक्यच नाही, ही शक्यताही मुसळधार पावसाने खोटी ठरवली. घरांना पाण्याने वेढा घालणे, पाच-सात फुटांवरील उभी पिके पाण्यात बुडणे, काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणे, पुराच्या पाण्यात नागरिक अडकून राहणे, त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलावणे, बोटी-हेलिकॉप्टर पाठवून ग्रामस्थांची सुटका करणे...अशा घटना लातुर जिल्ह्यात प्रथमच घडल्या. या अतिवृष्टीचा आणि पुराच्या पाण्याचा फटका जिल्ह्यातील लातूर, रेणापूर, औसा, निलंगा, अहमदपूर, चाकूर, जळकोट या तालुक्यांना बसला.

Latur Flood
गिरणा, जायकवाडी भरले; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राची चिंता दूर!

धरणात 12 वेळेस शून्य टक्के पाणी :

लातूरसह बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी मांजरा धरण हे अत्यंत महत्वाचे धरण आहे. लातूरकरांची तर ही जीवनवाहिनीच मानली जाते. हे धरण 1981 मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर 1988 मध्ये पहिल्यांदा हे धरण शंभर टक्के भरले होते. तेव्हापासून आजवर म्हणजे सुमारे 40 वर्षांत हे धरण 15 वेळेस पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणात 7 वेळेस 50 ते 99 टक्के पाणीसाठा तर 7 वेळेस 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा राहिला. धरणात आजवर तब्बल 12 वेळेस शून्य टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पाणी टंचाई असल्याने 2001 ते 05 आणि 2012 ते 16 हे वर्षे लातूरकर कधीही विसरणार नाहीत. मात्र, सलग 2 वर्षे मांजरा धरण 100 टक्के भरले आहे. आजवर बऱ्याचदा हे धरण परतीच्या पावसामुळे भरले आहे. पण, यंदा परतीच्या पावसाआधीच धरण भरल्याचे पहायला मिळत आहे.

डोळ्यांत दाटला आसवांचा पूर :

मांजरा धरणातून पाणी सोडल्याने आजवर लातुरात तीनवेळा पूरस्थिती निर्माण झाली. याआधी पुरामुळे नुकसान झाले नव्हते. पण, यंदाची पूरस्थिती भीषण असल्याने सर्वाधिक नुकसान करणाऱ्या पुराचे हे पहिलेच वर्ष ठरले आहे. मांजरा धरणाचे 18 दरवाजे उघडल्याची वेळ आली आणि मांजरा नदीत 70 हजार 845.30 क्यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर दुसरीकडे, मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. अनेकांच्या शेतात पाणी शिरले आहे. हजारो हेक्टर पीक पाण्याखाली गेले. काढणीला आलेल्या सोयाबीनचे आणि उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पण, झालेले पिकांचे नुकसान शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आसवांचा पूर आणणारे ठरले आहे.

धरण 15 वेळा शंभर टक्के :

1988, 1989, 1990, 1996, 1998, 2000, 2005, 2006, 2008, 2010, 2011, 2016, 2017, 2020, 2021

धीर देण्यासाठी नेते उतरले पाण्यात :

लातुरात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, ग्रामस्थ पाण्यात अडकले आहेत, हे वृत्त समजताच जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख हे मुंबईहून तातडीने लातुरात दाखल झाले. यांच्यासह आमदार धिरज देशमुख यांनी रेणापूर, लातूर या तालुक्यात जाऊन नुकसानीची पाहणी केली. अडकलेल्या नागरिकांपर्यंत मदतकार्य पोचवले. सरकार आपल्यासोबत आहे. नुकसान भरपाई मिळेल, अशा शब्दात त्यांनी ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना धीर दिला. तर दुसरीकडे, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर आणि आमदार अभिमन्यू पवार यांनीही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. सरकारने सरसकट मदत घ्यावी, यावर त्यांनी भर दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com