गिरणा, जायकवाडी भरले; मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राची चिंता दूर!

दोन दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे विभागातील गिरणा, तसेच मराठवाड्याचे जायकवाडी धरणे ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीत आहे.
Godawari river
Godawari riverSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : दोन दिवसांपासून झालेल्या संततधार (Heavy Rainflow) पावसामुळे विभागातील (Division) गिरणा (Girna) तसेच मराठवाड्याचे जायकवाडी (Jayakwadi) धरणे ओव्हरफ्लो (Overflow) होण्याच्या स्थितीत आहे. ही दोन्ही धरणे दिर्घ कालावधीनंतर शंभर टक्के भरल्याने उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याच्या पाण्याची चिंता मिटली.

Godawari river
रोहिणी खडसेंचा पाठपुरावा; जोंधनखेडा धरणासाठी ३० कोटी मंजूर

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे बहुतांश नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे धरणांची स्थिती ओव्हरफ्लो झाली आहे. गोदावरी व दारणा समुहातील धरणांतून विसर्ग वाढल्याने आज गोदावरीला मोठा पूर आला. प्रशासनाने नदीकाठची गावे तसेच शहरात ससावधानतेचा इशारा दिला आहे.

Godawari river
धुळे, नंदुरबारमध्ये शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करा !

सकाळी अकराला नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून ४५ हजार क्सुसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला. गंगापूर धरणाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली. दुपारी बारा नंतर धरणातून १५ हजार क्युसेक पेक्षा जास्त विसर्ग सुरु झाला. त्यामुळे नद्यांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे नदीलगतच्या गावांना सावधानदेता इशारा देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात नाशिक, जळगाव व धुळेसह राज्यातील सतरा जिल्ह्यांना मोठ्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. त्यानुसार शहर व जिल्ह्यात रात्रभर पवसाची रिपरिप सुरु होती. त्यामुळे बहुतांश नद्यांच्या पूराच्या पातळीत वाढ झाली. धरणे भरून गेली. त्यामुळे विसर्ग सुरु करण्यात आला आहे. गिरणा (मालेगाव) व जायकवाडी (पैठण) ही दोन्ही मोठी धरणे ओव्हरफ्लो होण्याची स्थिती आहे.

Godawari river
बलात्काराचे राजकारण आमदार सीमा हिरेंना पडले महागात!

काल रात्री पावसाची आकडेवारी मी.मी. मध्ये, येवला १०५, अंदरसूल ९१, नगरसुल १०५, पाटोदा ११५. सारवगाव १३६ तसेच देवळा तालुक्यात सरासरी ६३६, कळवणला २८१, इगतपुरी तालुक्यात ११५ व पेठला १२५ मीलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी व गिरणा या मोठ्या नद्यांसह त्यांच्या उपनद्यांना पूर आले. त्यात नांदगाव, येवला तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दुपारी या भागाचा दौरा करून पाहणी करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com